IND vs SL 1st ODI: कोलंबोच्या पहिल्या वनडे सामन्यात Shikhar Dhawan ने रचला इतिहास, बनला टीम इंडियाचा सर्वात वृद्ध कर्णधार
शिखर धवन (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st ODI: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार विराट कोहली मुख्य संघासह इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करत असल्यामुळे शिखर धवनला (Shikhar Dhawan) युवा भारतीय संघाच्या  (Indian Team) नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तब्बल 11 वर्षांपूर्वी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर धवनला पहिल्यांदा संघाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कर्णधार म्हणून टॉससाठी मैदानात उतरताच ‘गब्बर’ धवनने एक खास कीर्तिमान आपल्या नावावर केला आहे. धवन भारतीय संघाचा सर्वात वृद्ध वनडे कर्णधार ठरला आहे. (IND vs SL 1st ODI 2021: श्रीलंकेचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय; ईशान किशन समवेत मुंबईच्या ‘या’ स्टार फलंदाजाचे वनडेत पदार्पण)

धवनने 34व्या वर्षी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण मोहिंदर अमरनाथ यांना यादीत मागे टाकले. धवनचे वय सध्या 35 वर्ष आणि 225 दिवस आहे. तसेच यापूर्वी 1959 मध्ये हेमू अधिकारी यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पण केले तेव्हा त्यांचे वय 39 वर्षे आणि 190 दिवस होती. शिवाय, धवन भारतीय वनडे संघाचा 25 वा कर्णधार ठरला आहे. धवनपेक्षा मोठ्या वयात भारताकडून वनडे कर्णधार म्हणून पदार्पण करणाऱ्यांमध्ये विनु मंकड, सीके नायडू, विजय हजारे, इफ्तिखार अली खान पटौदी आणि लाला अमरनाथ यांचाही समावेश आहे. सध्या इंग्लंडमध्ये कसोटी संघासोबत असलेल्या विराट कोहली च्या अनुपस्थितीत धवन भारतीय मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व करीत आहे. श्रीलंका दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला उपकर्णधार नेमण्यात आले आहेत.

दुसरीकडे, दासुन शनाका श्रीलंकन संघाचे नेतृत्व करत असून तो चार वर्षातील संघाचा 10 वा कर्णधार आहे. धनंजय डी सिल्वा आणि वेगवान गोलंदाज दुशमंत चामिरा वगळता शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कडक आव्हान देऊ शकेल असे कोणतेही खेळाडू दिसत नाही.