IND vs SL 1st ODI 2021: श्रीलंकेचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय; ईशान किशन समवेत मुंबईच्या ‘या’ स्टार फलंदाजाचे वनडेत पदार्पण
सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st ODI 2021: कोलंबोच्या (Colombo) आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघात तीन सामन्यांच्या वनडे सामन्यांचा थरार रंगणार आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाची (Team India) धुरा शिखर धवनकडे आहे तर दसुन शनाका श्रीलंकन संघाचे नेतृत्व करत आहे. धवन पहिल्यांदा आंतराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात दसुन शनाकाने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रवि शास्त्रींच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच आजच्या सामन्यातून मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे. यापूर्वी यादव आणि किशनने एकत्र इंग्लंडविरुद्ध घरच्या टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले होते. दुसरीकडे, श्रीलंकेकडून भानुका राजपक्षेने वनडेत पदार्पण केले आहेत. (IND vs SL 1st ODI Live Streaming: भारत आणि श्रीलंका पहिला वनडे सामना लाईव्ह कधी आणि कसा पाहणार?)

दुसरीकडे, कर्णधार धवन आणि  फलंदाज पृथ्वी शॉ यांची जोडी भारतासाठी सलामीला उतरेल. ईशान किशन तिसऱ्या तर सूर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर मधल्या फळीत मैदानात उतरेल. मनीष पांडे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. हार्दिक आणि कृणाल पांड्या यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज म्हणून दीपक चाहर व भुवनेश्वर कुमार विरोधी संघावर दबाव आणतील तर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना संघात फिरकीपटू म्हणून संधी मिळाली आहे. कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये भारताच्या आघाडीच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघातील युवा सदस्यांना चांगली कामगिरी करण्याची संधी असून टी-20 विश्वचषक संघात निवडीसाठी दार ठोठावण्याची सुवर्ण संधी आहे. संघात नव्या चेहऱ्यांव्यतिरिक्त भारत अंडर-19 आणि A संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड पहिल्यांदा राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दौऱ्यावर गेले आहेत.

पाहा भारत-श्रीलंका प्लेइंग इलेव्हन

भारत प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कॅप्टन), पृथ्वी शॉ, ईशान किशन (विकेटकीपर), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: दासुन शनाका (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उदाना, दुश्मंत चमीरा, लक्षण संदाकन.