IND vs SL 1st ODI: कृणाल पांड्याची ‘ही’ कृती कॅमेर्‍यात कैद, नेटकरी म्हणाले ‘द्रविडच्या इफेक्ट’, पाहा व्हिडिओ
कृणाल पांड्या खिलाडूवृत्ती (Photo Credit: Twitter)

IND vs SL 1st ODI: कोलंबो (Colombo) येथे झालेल्या श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध भारत (India) संघातील पहिल्या सामन्यात यजमान संघाला 7 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेने नुकतीच इंग्लंडविरुद्ध व्हाईट बॉल मालिका खेळली होती, तर भारतीय संघ (Indian Team) मार्च महिन्यांनंतर पहिल्यांदा मैदानात उतरला होता. 100 दिवसांच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया (Team India) व्हाईट बॉल सामना खेळली. भारतीय गोलंदाज नियमित अंतराने विकेट घेत असल्यामुळे श्रीलंकन संघाला मोठ्या भागीदारीसाठी संघर्ष करावा लागला. कृणाल पंड्याने  (Krunal Pandya) शानदार गोलंदाजी करत एक विकेट घेतली आणि फक्त 2.60 इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. त्याच्या गोलंदाजीशिवाय कृणालने त्याच्या खिलाडू वृत्तीसाठीही सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधले. (IND vs SL 1st ODI: टीम इंडियाची विजयी सलामी, शिखर धवन-ईशान किशनचा अर्धशतकी धमाका; श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव)

श्रीलंकेच्या डावाच्या 22 व्या ओव्हरमध्ये धनंजय डी सिल्वाने खेळलेला शॉट वाचवण्यासाठी पांड्याने त्याच्या उजव्या बाजूला झेप घेतली. ओव्हरमधील दुसरा चेंडू डी सिल्वाने कृणालच्या दिशेने मारला जो अडवण्यासाठी त्याने आपल्या उजव्या बाजूला झेप घेतली. यादरम्यान त्याचा धक्का नॉन स्ट्राइकला असलेल्या चरिथ असलंका (Charith Asalanka) याला लागला. त्यानंतर कृणाल त्वरित उभा राहिला व त्याने असलंका याला मिठी मारली. त्याच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कृणालच्या या खिलाडूवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत असताना यूजर्सने याला राहुल द्रविडच्या साथीचा परिणाम असे म्हटले आहे. राहुल द्रविडमुळेच कृणालच्या वागण्यात बदल झाला आहे असे अनेक यूजर्सने सोशल मीडियावर म्हटले आहे. क्रुणाल मैदानावर खूप आक्रमक असतो पण या सामन्यात त्याची बदललेली शैली पाहून प्रत्येकजण चकित झाले.

कृणाल पंड्या तेव्हा आणि आता...

राहुल द्रविडच्या अंतर्गत

सामन्याबद्दल बोलायचे तर श्रीलंकेने दिलेल्या 263 धावांचे लक्ष भारतीय संघाने 3 विकेट्स गमावून 36.4 ओव्हरमध्ये गाठले. संघासाठी कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या शिखर धवनने नाबाद 86 धावा केल्या तर पदार्पणवीर ईशान किशनने 59 धावा, पृथ्वी शॉ याने तुफानी 43 धावांचे योगदान दिले. तसेच सूर्यकुमार यादव 31 धावा करून नाबाद परतला.यजमान श्रीलंकेसाठी धनंजय डी सिल्वाला 2 तर लक्षण संदकनने 1 विकेट काढली. तसेच श्रीलंकेच्या डावात भारताकडून दीपक चाहर, कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.