आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20W orld Cup) 2021 मध्ये आज टीम इंडियाचा (Team India) सामना स्कॉटलंडशी (Scotland) होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियासाठी या सामन्यात पुन्हा एक मोठा विजय गरजेचा आहे. भारत आणि स्कॉटलंड संघांमधील हा सामना दुबई (Dubai) इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना विसरणे सोप्पे नाही. तथापि असे देखील क्रिकेटपटू आहेत ज्यांनी भारताकडूनच नाही तर विदेशी संघाकडूनही नाव कमावले आहे. असेच एक मोठे नाव आहे ज्याने भारताकडून 24 हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत पण स्कॉटलंडसाठी टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूने 12 सामने खेळले आहेत. होय भारतीय क्रिकेटच्या दिग्गज क्रिकेटपटूने स्कॉटलंडसाठी 12 सामने खेळले आहेत आणि जर ते अन्य कोणी नाही तर ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाणारे माजी फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) आहेत. (T20 World Cup 2021: स्कॉटलंड कर्णधार विराट कोहलीवर फिदा, म्हणाला- ‘सामन्यानंतर आमच्या ड्रेसिंग रूममध्ये...’)
बीसीसीआयने भारतीय संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केलेल्या राहुल द्रविडने स्कॉटलंड संघासाठी 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. द्रविड 2003 मध्ये स्कॉटलंड राष्ट्रीय संघाकडून खेळला होता. भारतीय क्रिकेटपटूच्या कारकिर्दीतील एक दुर्मिळ गोष्ट ज्याबद्दल अनेकांना माहिती नसेल. द्रविड त्यावेळी भारताचा उपकर्णधार होता तर सौरव गांगुलीच्या हाती संघाची धुरा होती. तसेच न्यूझीलंडचे दिग्गज जॉन राइट मुख्य प्रशिक्षक होते. स्कॉटलंड संघ 2003 विश्वचषकनंतर सचिन तेंडुलकरकडून प्रशिक्षण घेऊन इच्छित होता. स्कॉटिश क्रिकेट युनियनचे प्रमुख ग्वेन जोन्स यांनी तेंडुलकरला पाठवण्यासाठी भारतीय संघाचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक जॉन राईट यांच्याशी संपर्क साधला परंतु राइट यांनी द्रविडला नव्याने पदोन्नती मिळालेल्या राष्ट्रीय संघात राहण्याची ऑफर दिली. द्रविडने हे आव्हान स्वीकारले आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठी इंग्लंडला गेला जिथे त्याने अकरा वनडे सामने खेळले.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत त्यांची नवविवाहित पत्नी विजेताही होती. द्रविडच्या 45,000 पाउंडच्या कराराला मुख्यतः स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी निधी दिला होता कारण देशाला भविष्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी एक भारतीय आंतरराष्ट्रीय स्टार हवा होता. माजी भारतीय कर्णधाराने स्कॉटलंडसाठी आपले सर्वस्व दिले आणि अकरा सामन्यांमध्ये 66.66 च्या सरासरीने 600 धावा ठोकल्या. तो स्पर्धेत स्कॉटलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, तथापि संघ बारा सामन्यात फक्त एक विजय मिळवू शकला. तरीही, द्रविडचा हंगाम खूप चांगला होता आणि त्याच्या स्कॉटिश सहकाऱ्यांसह अनेकांनी त्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ऑगस्ट 2007 मध्ये जेव्हा द्रविड वनडे सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून स्कॉटलंडला परतला, तेव्हा त्याचे आणि त्याच्या पत्नीचे देश व तेथील लोकांकडून त्याच उत्साहाने स्वागत करण्यात आले.