India U19 Women's National Cricket Team vs South Africa U19 Women's National Cricket Team Live Streaming: भारतीय महिला अंडर 19 राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला अंडर 19 राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आयसीसी महिला अंडर 19 विश्वचषक 2025 चा अंतिम सामना 02 फेब्रुवारी रोजी क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे खेळवला जात आहे. दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आयसीसी अंडर 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्याचे भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाईल. प्रेक्षक लाईव्ह टेलिव्हिजनवर या रोमांचक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, डिस्ने+ हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
भारतीय महिला अंडर 19 क्रिकेट संघ शानदार कामगिरी करत ऐतिहासिक विश्वचषक जिंकण्याची तयारी दाखवली आहे. भारतीय संघ 2024 ने अंडर 19 महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद राखण्याचे ध्येय ठेवेल आहे. जिथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. हा सामना गेल्या वर्षी झालेल्या पुरुषांच्या टी- 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याइतकाच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
आयसीसी अंडर 19 महिला टी 20 विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर 19 महिला टी 20 विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्याचे प्रसारण हक्क डीडी स्पोर्ट्सने विकत घेतले आहेत. जे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर 19 महिला टी 20 विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील प्रदान करेल. तथापि, डीडी स्पोर्ट्स 1.0 वर भारताच्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण फक्त डीडी फ्री डिश आणि इतर डीटीटी वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. डीडी स्पोर्ट्सवर भारतातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण केबल टीव्ही किंवा एअरटेल डिजिटल टीव्ही, टाटा प्ले, डिश टीव्ही इत्यादी डीटीएच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसेल.