टीम इंडिया (Photo Credit: PTI)

India Squad for SA: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 15 वा सीजन आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आयपीएल (IPL) नंतर 9 जूनपासून टीम इंडियाचे (Team India) आंतरराष्ट्रीय सामने पुन्हा सुरु होणार आहेत. दक्षिण अफ्रिका संघ यावेळी भारत दौऱ्यावर (South Africa Tour of India) येणार असून दोन्ही संघात 5 टी-20 मालिका खेळली जाणार आहे. आणि यासाठी भारतीय संघात कोणाला नवीन संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असेल. सध्याच्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धच्या T20 मालिकेसाठी संघ निश्चित करण्यासाठी निवडकर्ते 23 मे रोजी कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) भेट घेणार आहेत. मात्र, निवड कर्त्यांसमोर एक मोठी डोकेदुखी असेल कारण तब्बल पाच खेळाडू दुखापतग्रस्त आहेत तर तीन जण फॉर्ममध्ये नाहीत. तसेच विराट कोहलीला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. (IND Squad for SA T20I Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात होतील मोठे बदल; पाहा कोण करणार आराम, कोणाच्या हाती असेल संघाची कमान)

रवींद्र जडेजा, दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव हे सर्व जखमी असून त्यांचे खेळणार संशयास्पद बनले आहेत. तर वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन अजूनही तंदुरुस्त आहेत पण निवडकर्ते धोका पत्करू इच्छित नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात जडेजाला दुखापत झाली, ज्यामुळे तो आयपीएलच्या उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे. तसेच सूर्यकुमार यादवला देखील मॅचदरम्यान दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सच्या उर्वरित सामन्यातून बाहेर बसणे भाग पडले आहे. दुसरीकडे, दीपक चाहर अजूनही आपल्या दुखापतीतून सावरलेला नाही, त्यामुळे बोर्ड दीपकचे मालिकेतून बाहेर राहणे निश्चित आहे. दुसरीकडे, मात्र, ज्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे त्यांची यादीही मोठी आहे. मोहम्मद शमी व्यतिरिक्त विराट कोहली हा एक उमेदवार आहे.

गुजरात टायटन्स आधीच आयपीएल 2022 प्लेऑफसाठी पात्र ठरल्यामुळे, शमीला काही सामन्यांसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तर निवडकर्ते संभाव्य विश्रांती बाबत कोहलीशी चर्चा करू शकतात. तथापि, टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी उपलब्ध असेल. आयपीएल नंतर त्याने ब्रेक घेतल्याची चर्चा होती, कारण मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 प्लेऑफसाठी पात्र ठरला नसल्यामुळे त्याला एक आठवड्याचा ब्रेक मिळेल.