Tilak Verma and Sanju Samson (Photo Credit - X)

South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 4th T20I Match: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज (IND vs SA 4th T20I) जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य दिले आहे.

दरम्यान, चौथ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी शानदार फलंदाजी करत अवघ्या 35 चेंडूत 73 धावा केल्या.

टीम इंडियाने 20 षटकात एक विकेट गमावून 283 धावा केल्या. टीम इंडियासाठी तिलक वर्माने सर्वाधिक 120 नाबाद धावांची स्फोटक खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान तिलत वर्माने अवघ्या 47 चेंडूत 10 षटकार आणि 9 चौकार लगावले. तिलक वर्माशिवाय संजू सॅमसननेही अवघ्या 56 चेंडूंत सहा चौकार आणि नऊ षटकार लगावत 109 धावा केल्या.

लुथो सिपमला याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुथो सिपमला याने सर्वाधिक एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 284 धावा करायच्या आहेत. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे.