(Photo Credit: Getty)

भारत (India) दौर्‍यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका (South Africa) संघासाठी हा दौरा इतका खास नव्हता. पहिले टी-20 मालिका ड्रॉ झाल्यावर संघाला तीन सामन्यांच्या टेस्ट मालिकेत 2-0 असा पराभव पत्करावा लागला. आणि आता संघ मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून सन्मान वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आजपासून रांचीमध्ये सुरु झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासमोर टॉसच्या वेळी आफ्रिकेच्या दोन कर्णधारांचे आव्हान होते. फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याला मागील 9 सामन्यात टॉसयामध्ये अपयश मिळाले होते. त्यामुळे त्याच्यासोबत तिसऱ्या टेस्टमध्ये प्रॉक्सी कर्णधार म्हणून टेंबा बाबुमा (Temba Bavuma) मैदानात उतरला होता. तरीही विराट यंदाही डु प्लेसिसवर भारी पडला. यावेळी डु प्लेसिससह विराटलाही हसू आवरलं नाही. (IND vs SA 3rd Test: कगिसो राबाडा याच्यानंतर 'या' दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांनी विराट कोहली च्या रूपात मिळवली पहिली टेस्ट विकेट)

यासह आशिया खंडातील टॉसमध्ये हा डु प्लेसिसचा सलग दहावा पराभव आहे. पण, डु प्लेसिसने टॉस जिंकण्यासाठी हे धोरण स्वीकारण्याची ही पहिली वेळ नाही. मागील वर्षीही त्याने असेच केले आहे. 2018 मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्ध  सामन्यात टॉससाठी जेपी डुमिनी याला पाठविले होता. आणि याचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला. दरम्यान, विराट आणिडु प्लेसिसचा टॉसदरम्यानचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पहा...

याआधी महिलांच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाची  कर्णधार मेग लॅनिंग ने अशी रणनीती वापरली होती. श्रीलंकाविरुद्ध सामन्यात टॉस जिंकण्यासाठी मेग एलिसा हिली ला सोबत घेऊन आली होती. टॉसमध्ये लॅनिंगचा बराच काळ रेकॉर्ड खराब राहत होता, आणि हे बदलण्यासाठी तिने टॉससाठी स्पेशलिस्ट हिलीला घेऊन येण्याचे ठरविले. आणि लॅनिंगला याचा फायदा झाला आणि ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला.