टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील तिसऱ्या मॅचमध्ये टॉस जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, भारतीय संघाची (Indian Team) सुरुवात काही चांगली झाली नाही. आणि लंचपर्यंत संघाने 71 धावांवर 3 विकेट गमावले. मागील दोन टेस्टप्रमाणे यंदाही मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मयंकने 2 चौकाराच्या मदतीने 10 धावा केल्या आणि कगिसो राबाडा (Kagiso Rabada) याच्या गोलंदाजीवर डीन एल्गार याच्या हाती झेल बाद झाला. त्यानंतर रबाडाने चेतेश्वर पुजारा यालाही तंबूत परत पाठवलं. पुजाराला शून्यावर रबाडाने एलबीडब्ल्यू आऊट केले. चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट फलंदाजीसाठी आला, पण तोही रोहितला जास्त साथ देऊ शकला नाही आणि 12 धावांवर एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) याचा शिकार बनला. विशेष म्हणजे विराटची विकेट नॉर्टजेची पहिली टेस्ट विकेट आहे. (IND vs SA 3rd Test Day 1: क्रिकेटपटू शाहबाझ नदीम याचा वयाच्या तिशीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु, 15 वर्षांती तपश्चर्या आली फळाला)
नॉर्टजेने भारतविरुद्ध पुणे टेस्टमधून आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये पदार्पण केले. पण, या मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही आणि त्याने 100 धावा लुटवल्या. दरम्यान, आजच्या मॅचमध्ये नॉर्टजेने विराटला 15 व्या ओव्हरमध्ये एलबीडब्ल्यू आऊट केले आणि संघाला तिसरे यश मिळवून दिले. यात सर्वात लक्षवेधी म्हणजे की यापूर्वी सहकारी रबाडाने 2015 मध्ये भारतविरुद्ध मोहाली (Mohali) मॅचद्वारे टेस्टमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये त्यानेदेखील विराटच्या रूपात पहिली टेस्ट विकेट मिळवली होती. शिवाय, सेनुरन मुथुसामी यानेदेखील विराटची पहिली टेस्ट विकेट मिळवली होती. मुथुसामीने यंदाच्या पहिल्या टेस्टमध्ये कोहलीला पहिल्या डावात 20 धावांवर बाद केले आणि टेस्टमधील पहिली टेस्ट विकेट मिळवली.
A maiden Test wicket for Senuran Muthusamy & what a wicket it is! Virat Kolhi is caught & bowled for 20. IND 377/3 (103.1 ovs). #INDvSA #FreedomSeries pic.twitter.com/pVPYJjWLCW
— Cricket South Africa (@OfficialCSA) October 3, 2019
आजच्या मॅचमध्ये सलामी फलंदाज मयंक10 धावांवर बाद झाला. भारताच्या 10 ओव्हरमध्ये 2 बाद 17 धावा झाल्या होत्या. रबाडाच्या चेंडूवर एल्गरकडे झेल देऊन मयंक बाद झाला. त्यानंतर पुजारा खातंही उघडू शकला नाही आणि रबाडाच्या गोलंदाजीवर पायचित झाला. दरम्यान, टीम इंडियायाआधीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 137 धावांनी मोठा विजय मिळवला.