IND vs SA 3rd Test Day 2: रांचीमध्ये दुहेरी शतक करत रोहित शर्मा याने केली सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांची बरोबरी, वाचा सविस्तर
रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

भारतीय टेस्ट संघाचा (Indian Team) नवीन सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्याच दिवशी शानदार दुहेरी शतक केले. असे करणारा रोहित फक्त पाचवा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) , चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी टेस्टमध्ये दुहेरी शतक करण्याचा मान पटकावला आहे. रोहितचे टेस्ट कारकिर्दीतील हे पहिले दुहेरी शतक आहे. यापूर्वी रोहितने वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतकं केली आहेत. या शतकासह रोहितचा सचिन, सेहवाग आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज क्रिस गेल यांच्या एलिट यादीत समावेश झाला. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 3 दुहेरी शतके केली आहेत आणि 50 ओव्हर क्रिकेटमध्ये 264 अशी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. (IND vs SA 3rd Test Day 2: रोहित शर्मा याचा डबल धमाका, टेस्ट कारकिर्दीत पहिल्यांदाच झळकावले दुरेही शतक)

दरम्यान, रोहितने 249 चेंडूत 28 चौकार आणि 4 षटकारांसह द्विशतक झळकावले. रविवारी आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या सेहवागप्रमाणे लुंगी एनगीडी (Lungi Ngidi) याच्या गोलंदाजीवर षटकार मारत रोहितही त्याचे दुहेरीत शतक पूर्ण केले. आणि अशा प्रकारे वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतके ठोकल्यानंतर रोहित कसोटीत 200 पेक्षा अधिक धावा काढणारा पहिला फलंदाज ठरला आहे. शिवाय, विनू मंकड, बुधी कुंदरन, सुनील गावस्कर आणि सेहवागनंतर एका कसोटी मालिकेत 500 धावा करणारा तो फक्त 5 वा भारतीय सलामी फलंदाज आहे. उल्लेखनीय म्हणजे, दक्षिण आफ्रिकाविरूद्ध सुरू असलेल्या मालिकेत दुहेरी शतक झळकावणारा रोहित हा मयांक अग्रवाल आणि विराट कोहलीनंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

हिटमॅन रोहितने दक्षिण आफ्रिएकविरूद्धच्या या मालिकेत तीन शतकांसह 100 च्या सरासरीने 529 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित भारताकडून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा दुसरा खेळाडू ठरला. रोहितपूर्वी सेहवागने हा कमाल केला होता. सेहवागने 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सलामी फलंदाज म्हणून 500 हून अधिक धावा केल्या ज्यामध्ये एक तिहेरी शतकाचा समावेश आहे.