
पहिल्या दिवसाप्रमाणेच भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील दुसर्या दिवशीचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवत मोठी धावसंख्या उभारली. भारताने त्यांचा पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. चहाच्या वेळेपर्यंत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनी सुरुवातीला दोन मोठे धक्के दिले. नंतरचा खेळ कालच्याप्रमाणे खराब प्रकाशामुळे थांबला आहे. खेळ थांबल्यापर्यंत आफ्रिकेची धावसंख्या 9/2 आहे. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या आफ्रिका संघाने डीन एल्गार आणि क्विंटन डी कॉक यांची विकेट गमावली. क्रीजवर सध्या झुबैर हमजा आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस नाबाद खेळत आहेत. (IND vs SA 3rd Test: उमेश यादव याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध रांची मालिकेत ठोकले एकापाठोपाठ 5 षटकार, विराट कोहली ही झाला अवाक, पहा Video)
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताने 3 विकेट गमावले होते. रहित शर्मा य शतक पूर्ण अरुण खेळत होता तर अजिंक्य रहाणे याने आपले शतक पूर्ण केले. रोहित आणि रहाणेने 267 धावांची भागीदारी करत संघाला मुश्किल परिस्थितीतून बाहेर काढले. दुसऱ्या दिवशीच्या लंचनंतर रोहितने षटकारांसह आपली पहिली दुहेरी पूर्ण केली. त्याने 250 चेंडूत दुहेरी शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने 28 चौकार आणि 6 षटकार लगावले. मात्र, दुहेरी शतकानंतर वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. रोहित 212 धावांवर बाद झाला तर रहाणे 115 धावांवर माघारी परतला. यांच्यानंतर रवींद्र जडेजा याने काही मोठे शॉट खेळात भारताला 400 धावा पूर्ण करून दिल्या. जडेजा 51 धावांवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात बाद झाला. विकेटकीपर आणि फलंदाज रिद्धिमान साहा काही खास कामगिरी करू शकला नाही आणि तो 42 चेंडूत 24 धावा करून माघारी परतला. डावाच्या शेवटी उमेश यादव याने दमदार फलंदाजी केली. त्याने 10 चेंडूत पाच षटकारांसह 30 धावांची वेगवान खेळी केली. आणि त्याच्या बाद झाल्यावर शमी मैदानावर आला आणि त्यानेही एक षटकारा मारला.
दरम्यान, टॉस जिंकून भारताने पहिले फलंदाजी केली, पण त्यांने अपेक्षेप्रमाणे सुरुवात करता आली नाही. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. पहिल्या दिवशी भारताचे तीन मोठे विकेट मिळवल्यावर आफ्रिकी गोलंदाजांना त्याच्या खेळात सातत्य राखता आले नाही, परिणामी भारताने पुन्हा एकदा मालिकेत मोठी धावसंख्या उभारली.