IND vs SA 3rd ODI: चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा सफाया, तिसऱ्या वनडेत अवघ्या 4 धावांच्या विजयाने दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने काबीज केली मालिका
दीपक चाहर (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 3rd ODI: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa) टीम इंडियाचा (Team India) शेवट पराभवाने झाला आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघाला (Indian Team) क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आहे. चुरशीच्या सामन्यात शिखर धवन, विराट कोहली आणि दीपक चाहरने (Deepak Chahar) झुंजार अर्धशतक ठोकले पण यजमान Proteas ने पाहुण्या संघाचा क्लीन स्वीप करून 3-0 अशी मालिका काबीज केली. सलामीवीर क्विंटन डी कॉक, रसी व्हॅन डर डुसेन आणि गोलंदाज Andile Phehlukwayo यजमान संघाच्या विजयाचे नायक ठरले. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 65 तर ओपनर शिखर धवनने 61 धावा केल्या. तसेच चाहरने 54 धावा करून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या पण भारताच्या फलंदाजीचे शेपूट शेवट गोड करण्यात आणि क्लीन स्वीप टाळण्यात अपयशी ठरला. (IND vs SA 3rd ODI: केपटाऊन वनडेत दक्षिण आफ्रिकेचा विश्वविक्रमी विजय, टीम इंडियाचा क्लीन स्वीप करून पाकिस्तानच्या रेकॉर्डची केली बरोबरी)

टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताची बॅटने पुन्हा सुरुवात खराब ठरली आणि केएल राहुल अवघ्या 18 धावसंख्येवर माघारी परतला. यांनतर धवन आणि कोहलीने 98 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. आंदिल फेहलुकवायोने आपल्या एकाच षटकात धवन पाठोपाठ रिषभ पंत भोपळा न फोडता तंबूतचा रस्ता दाखवला. यानंतर विराटने संयमी फलंदाजी करून 64 वे वनडे अर्धशतक झळकावले, तथापि तो पुन्हा एकदा चांगल्या खेळीचे तिहेरी धावसंख्येत रूपांतर करण्यात अपयशी ठरला. श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव, या दोघांकडून संघाला अपेक्षा होता ज्याची ते पूर्तता करू शकले नाही. श्रेयसने 26 आणि सूर्यकुमारने 39 धावा केल्या. जयंत यादव देखी बॅटने विशेष योगदान देऊ शकला नाही. पण दीपक चाहरने संधीचा फायदा करून घेत जसप्रीत बुमराहसह अर्धशतकी भागीदारी केली, पण संघ विजयाच्या जवळ पोहोचला असताना चुकीचा फटका खेळून पॅव्हिलियनमध्ये परतला. अखेरीस उर्वरित फलंदाज त्याच्या खेळीला सार्थक असा विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. लुंगी एनगिडी आणि आंदिल फेहलुकवायोने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

दरम्यान, अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि दक्षिण आफ्रिका संघाने क्विंटन डी कॉकचे शतक, रसी व्हॅन डर डुसेनचे अर्धशतक आणि डेविड मिलरचा 39 धावांच्या छोटेखानी योगदानाने निर्धारित 50 षटकांत सर्व विकेट गमावून 287 धावा केल्या आणि भारताला क्लीन स्वीप टाळण्यासाठी 288 धावांचे लक्ष्य दिले. या सामन्यात भारतकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आर दीपक चाहर आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या.