भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: Twitter/ICC)

भारताचा पुरुष क्रिकेट संघ (India Men's Cricket Team) डिसेंबर ते जानेवारी 2021/22 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) तीन फॉरमॅट दौऱ्यासाठी सज्ज आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिका संघ तीन सामन्याने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC) 2021-23 मोहिमेला सुरुवात करेल. यापूर्वी क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) ने शुक्रवारी दौऱ्यात किंचित बदल जाहीर केला. जोहान्सबर्ग ऐवजी केपटाऊनमध्ये (Cape Town) नवीन वर्षाची कसोटी मॅच आयोजित केली जाईल असे CSA ने जाहीर केले. 17 डिसेंबरपासून तीन वनडे (11 ते 16 जानेवारी) आणि चार टी-20I (19 ते 26 जानेवारी) आधी तीन कसोटींसह मल्टी-फॉरमॅट दौरा सुरू होईल. महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्या स्मरणार्थ गांधी-मंडेला मालिका (Gandhi-Mandela Series) असे नामकरण करण्यात आलेल्या कसोटी मालिकेतील विजेता संघ स्वातंत्र्य ट्रॉफीने गौरवण्यात येईल.

“CSA दक्षिण आफ्रिकेत भारताचे परत स्वागत करण्यास उत्सुक आहे, जे 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन:प्रवेश केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या भारत दौऱ्याच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त देखील लक्षणीय आहे. हा दौरा BCCI सोबतच्या आमच्या अनोख्या नातेसंबंधाची पुष्टी करतो,” CSA चे क्रिकेट संचालक ग्रॅम स्मिथ म्हणाले. CSA कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी, फोलेत्सी मोसेकी म्हणाले, “क्रिकेट दक्षिण आफ्रिका, जगभरातील लोकांसह महात्मा गांधींचा 152 वा वाढदिवस साजरा करत असताना हा दौरा योग्य क्षणी आला आहे. गेल्या काही वर्षांपासून आमच्या क्रिकेट प्रयत्नांना भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही खरोखरच ऋणी आहोत. आम्ही आमच्या पाहुण्यांना मैदानावर चारशीचे आव्हान देण्यास उत्सुक आहोत.” लक्षात घ्यायचे की दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक

कसोटी मालिका

पहिली कसोटी: 17-21 डिसेंबर, जोहान्सबर्ग

दुसरी कसोटी: 26-30 डिसेंबर, सेंच्युरियन

तिसरी कसोटी: 3-7 जानेवारी, केपटाऊन

एकदिवसीय मालिका

पहिली वनडे: 11 जानेवारी, पार्ल

दुसरी वनडे: 14 जानेवारी, केपटाऊन

तिसरी वनडे: 16 जानेवारी, केपटाऊन

टी-20I मालिका

पहिला टी-20: 19 जानेवारी, केपटाऊन

दुसरा टी-20: 21 जानेवारी, केपटाऊन

तिसरा टी-20: 23 जानेवारी, पार्ल

चौथा टी-20: 26 जानेवारी, पार्ल