भारतीय कसोटी संघाचा (India Test Team) उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या फॉर्मशी झगडत आहे. न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून दुखापतीमुळे वगळण्यात आले होते. बीसीसीआयने (BCCI) त्यामागे हॅमस्ट्रिंगचे कारण सांगितले. प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर आता रहाणेकडून कसोटीतील उपकर्णधारपदही हिरावून घेतले जाऊ शकते. बीसीसीआय आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (South Africa Tour) रहाणेच्या जागी कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करू शकते. या शर्यतीत टी-20 कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आघाडीवर आहे. बीसीसीआय आज महत्वपूर्ण बैठक होणार असून लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते. (IND vs NZ: खराब फॉर्ममुळे Ajinkya Rahane याच्या हातून जाणारा टेस्ट उपकर्णधारपद? ‘हे’ 2 धाकड बनू शकतात प्रबळ दावेदार)
कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत रहाणे स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला. कानपूरच्या दोन्ही डावांत रहाणेला अनुक्रमे 35 आणि 4 धावा करता आल्या. रहाणेला खराब फॉर्मचा फटका बसू शकतो आणि रोहित शर्मा क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉर्मेटमध्ये नवीन उपकर्णधार होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी संघात रोहित शर्माच्या निवडीमध्ये हस्तक्षेप होत आहे. TOI च्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “संघाच्या निवड समितीची बैठक काही दिवसांत होणार आहे. रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवले जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्धार केला आहे. मात्र, वेळापत्रकानुसार हा दौरा योग्य वेळी सुरू होणार नाही.” बीसीसीआयने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला सांगितले आहे की ते बॉक्सिंग डे कसोटीने दौऱ्याची सुरुवात करेल.
दरम्यान, रहाणेने गेल्या वर्षी विराटच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळली होता आणि ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयात संघाचे नेतृत्व केले होते. पण अलीकडच्या काळात तो त्याच्या खराब फॉर्मशी संघर्ष करत आहे. 2021 मध्ये रहाणेने 12 कसोटी सामन्यांमध्ये 20.35 च्या सरासरीने केवळ 407 धावा केल्या आहेत, तर गेल्या वर्षी चार सामन्यांमध्ये 38.86 च्या सरासरीने अवघ्या 272 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध विश्रांती देण्यात आलेले खेळाडू शुक्रवारी मुंबईत पोहोचल्यानंतर क्वारंटाईन सुरू करतील. त्यांचे आयसोलेशन कठीण होईल का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.