तिसऱ्या आणि अंतिम टी-20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यास टीम इंडिया (Indian Team) सज्ज आहे. दोन्ही संघातील पुढची मॅच रविवारी, 22 सप्टेंबरला खेळली जाईल. भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पहिल्या सामन्यात विजयी खेळी केली होती. विराटने नाबाद 72 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. यासह विराटने टी-20 मध्ये रोहित शर्मा याचा रेकॉर्ड मोडला आणि सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची नोंद केली. दरम्यान, आज विराटने त्याचा एक जुना फोटो शेअर केला आहे. विराटने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा लेटेस्ट फोटो आहे तर दुसरीकडे, तो 16 वर्षाचा होता तेव्हाचा एक फोटो आहे. विराटचा हा फोटो बघून तुम्हाला समजेल की मागील काही वर्षात त्याने आपल्या फिटनेसवर किती लक्ष दिले आहे आणि यावर कामही केले आहे. (ट्रक ते मर्सिडीज जीप; हार्दिक पंड्या याने Throwback फोटो शेअर करत दिला संघर्षमयी जीवनाला उजाळा, शेअर केला टीम इंडियापर्यंतचा प्रवास )
फोटो शेअर करताना विराटने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी, जेव्हा माझ्या यंगर सेल्फला जाताना पाहताना.' विराट एकेकाळी बर्यापैकी गुबगुबीत असायचा, परंतु त्यानंतर त्याने त्याच्या फिटनेसवर कठोर परिश्रम केले आणि सध्या त्याला जगातील सर्वात फिट क्रिकेटपटूंपैकी एक मानले जाते. क्रिकेटच्या दौऱ्यावर असो किंवा नसो, विराट त्याची कसरत आणि डाएट या दोन्ही गोष्टींची खूप काळजी घेतो. विराटच्या या फोटोवर चाहत्यांनी देखील मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी विराटचा सध्याचा फोटो एडिट करत त्याच्याबाजून काही मजेशीर फोटोज ऍड केले आहेत.
Me looking at my younger self going 🙅♂️🤦♂️. #throwback #16yearsold pic.twitter.com/EMFtD7TMnl
— Virat Kohli (@imVkohli) September 20, 2019
पहा चाहत्यांच्या प्रतिक्रिया:
जा ब्रश करून ये...
"Jaa Brush karke aa.. " pic.twitter.com/wQLzUFq2Up
— LolmLol (@LOLiyapa) September 20, 2019
विराट कोहली
— कानू मोंडल (@Kanatunga) September 20, 2019
दाण्या-दाण्यात आले केशरची चव
Dane Dane mein hai kesar ka sawad 😂 pic.twitter.com/7o6bewk1Uj
— Pranjul Sharma (@Pranjultweet) September 20, 2019
पैसे असल्यास काहीही होऊ शकत नाही
— Omkar Shetty (@omkar_shettyg) September 20, 2019
विराट सध्या बेंगळुरूमध्ये आहे, जिथे भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळेल. टीम इंडियाने मोहाली येथील दुसरी मॅच जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. विराटने मोहाली मॅचमध्ये 72 धावा आणि एक जबरदस्त कॅच पकडला होता. यासाठी विराटला सामनावीर म्हणूनही निवडले गेले.