टीम इंडियामध्ये स्थान मिळविणे हे कुणाचेही स्वप्न असते. पण, टीम इंडियाची (Team India) ब्लू जर्सी घालण्यासाठी क्रिकेटपटूला खूप मेहनत करावी लागते. इतकेच नाही तर त्याला अनेक कठीण परीक्षांनाही सामोरे जावे लागले आहे आणि त्यानंतर त्याचे टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. अशीच काहीशी गोष्ट आहे भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याची. हार्दिकने याआधी अनेक मुलाखतींमध्ये खुलासा केला आहे की त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, असे असूनही त्याने क्रिकेटमध्ये सतत परिश्रम घेतले. पैशासाठी हार्दिक आणि त्याचा भाऊ क्रुणाल जवळच्या खेड्यांमध्ये क्रिकेट खेळत असत आणि प्रत्येक सामन्यात त्यांना काही रुपये कमवायचे. पंड्याने त्या दिवसांची आठवण काढत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. पंड्या आता जरी मोठ्या, महागड्या गाडींमध्ये फिरतो पण, एकेकाळी तो ट्रकमध्ये बसून प्रवास करायचा. (हार्दिक पंड्या vs कृणाल पंड्या: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेआधी पंड्या बंधू आले आमने-सामने, पहा कोण राहिला वरचढ)
हा फोटो खूप जुना आहे ज्यामध्ये तो एका ट्रकमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. लोकल ,मॅच खेळण्यासाठी ट्रकवर चढून तो कित्येक वेळा कसा आला, हे पोस्ट क्रिकेटच्या त्याच्या जुन्या कठीण दिवसांचा संदर्भ देत त्याने सांगितले. फोटो शेअर करताना हार्दिकने लिहिले की, “त्या दिवसांमध्ये मी स्थानिक सामने खेळण्यासाठी ट्रकमधून प्रवास करायचो. ज्याने मला बरेच काही शिकण्यास मिळाले. आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला आहे. मला हा खेळ आवडतो."
पंड्याने कठीण दिवस सहन करत भारतीय संघापर्यंतचा प्रवास केला आहे. आता हार्दिकनंतर त्याचा प्रतिभावान भाऊ क्रुणाल पंड्या ने देखील भारतीय संघात (Indian Team) स्थान मिळवले आहे. हार्दिक सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये व्यस्त आहे. दुसऱ्या मॅचमध्ये पंड्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण गोलंदाजी करताना पंड्याने धोकादायक फलंदाज डेव्हिड मिलर याला बाद करत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 7 गडी राखून पराभूत केले.