दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ सप्टेंबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी सीएसए, क्रिकेट साऊथ आफ्रिकाने (CSA) संघाची घोषणा केली आहे. टी-20 मालिकेसाठी कर्णधारपद यष्टीरक्षक क्विंटन डि कॉक (Quinton de Kock) याच्याकडे सोपवण्यात आले आहे. या संघातून मात्र, फॅफ ड्यू प्लेसिस (Faf du Plessis) याला वगळण्यात आले आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज डेल स्टेनला वगळण्यात आलं आहे. आणि टेस्ट मालिकेसाठी संघाच्या कर्णधारपदी मात्र ड्यू प्लेसिस कायमआहे.
दरम्यान, टी-20 संघात तीन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज एनरीच नोर्जे, फिरकीपटू ब्योर्न फोर्चुन आणि फलंदाज बावुमा यांना स्थान मिळाले आहेत. आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला 15 सप्टेंबरपासून टी-20 सामन्याने सुरुवात होणार आहे. दुसरीकडे, एडेन मार्क्राम, थियनिस दे ब्रूयनआणि लुंगी एनगीडी यांची टी-20 संघात निवड झालेली नाही, कारण तिघेही दक्षिण आफ्रिकेसाठी टेस्ट मालिकेच्या अगोदर भारत-अ विरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळणार आहेत.
कसोटी संघ: फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), टेंबा बवुमा, थेयूनीस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डिन एल्गर, झुबयर हम्झा, केशव महाराज, एडन मार्कराम, सेनुरन मुथूसॅमी, लुंगी एनगिडी, अॅनरिच नोर्टजे, वेर्नोन फिलेंडर, डेन पिएड, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.
टी 20 संघ: क्विंटन डि कॉक (कॅप्टन), रॉसी व्हॅन डेर डुसेन, टेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.