केएल राहुल (Photo Credit: Twitter/BCCI)

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवालच्या सलामी जोडीने शानदार शतकी भागीदारी करून तो निर्णय योग्य ठरवला. मयंक 60 धावा करून पहिल्याच दिवस पॅव्हिलियनमध्ये परतला असला तरी राहुल नाबाद 122 धावा करून खेळत आहे. टीम इंडियाच्या (Team India) सलामीच्या जोडीने झटपट धावा केल्या. स्टार फलंदाज राहुलने धडाकेबाज शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आणि आता त्याला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात राहुलने झंझावाती शतक झळकावले. त्याने 248 चेंडूत 17 चौकार आणि एका षटकारासह 122 धावा केल्या. राहुलने मैदानात चहुबाजूने फटकेबाजी केली आणि त्याच्या या स्फोटक खेळीसमोर दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज हतबल दिसले. (IND vs SA 1st Test Day 2: सेंच्युरियनमध्ये पावसामुळे दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला विलंब, हवामान टीम इंडियासाठी ठरू शकते डोकेदुखी)

राहुलच्या धडाकेबाज खेळीमुळे भारत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. जर राहुलने आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक ठोकले तर तो दक्षिण आफ्रिकेत द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरेल. भारतीय संघाच्या फलंदाजांनीं आतापर्यंत जगभर वर्चस्व गाजवले आहे, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आतापर्यंत कोणालाही द्विशतक झळकावता आलेले नाही. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांनाही हा पराक्रम करता आलेला नाही. माजी फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 शतके आणि 3 अर्धशतकेही झळकावली असून त्याची सर्वोच्च खेळी 169 धावांची राहिली. भारतीय फलंदाजाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक खेळी आहे. अशा परीस्थितीत जर राहुलने आता द्विशतकी टप्पा गाठला तर तो ऐतिहासिक खेळी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरेल. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने 153 धावा केल्या.

सामन्याबद्दल बोलायचे तर राहुल आणि मयंक या स्टार फलंदाजांनी शानदार खेळी करत भारतीय संघाला चांगल्या स्थितीत आणले आहे. तर फलंदाज चेतेश्वर पुजारा एकही धाव न काढता बाद झाला. कर्णधार विराट कोहलीही कोणतीही मोठी कामगिरी करू शकला आणि अवघ्या 35 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. अशा स्थितीत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी राहुलकडून संघाला मोठ्या आशा असतील.