सेंचुरियन हवामान अपडेट (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 5 Centurion Weather: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका  (South Africa) यांच्यात सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रोमांचक वळणावर आहे. टीम इंडियाला (Team India) सामन्याच्या पाचव्या दिवशी (गुरुवार) विजयासाठी 6 विकेट्सची गरज असताना, दक्षिण आफ्रिकेला आणखी 211 धावांची गरज आहे. पावसाने आजचा खेळ खराब केला नाही, तर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया मालिकेची विजयी सुरुवात करू शकते. गोलंदाजांसाठी उपयुक्त सेंच्युरियन खेळपट्टीवर 305 धावांचा पाठलाग करणे सोपे नाही. आणि पाचव्या दिवशी सेंच्युरियनमधील हवामान ‘विराटसेने’च्या आशेवर पाणी फेरू शकते. सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमववर पाचव्या दिवसाच्या हवामानाची स्थिती खालीलप्रमाणे आहे. (IND vs SA 1st Test Day 5 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सेंच्युरीयन टेस्ट सामन्याच्या पाचव्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?)

पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस पावसाच्या वाहून गेल्याने क्रिकेट चाहत्यांना दिवस तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पूर्ण 90 षटकांचा सामना पाहायला मिळाला. तथापि, पाचव्या दिवसासाठी हवामानाचा अंदाज अनुकूल दिसत नाही कारण Accuweather ने गुरुवारी, 30 डिसेंबर रोजी गडगडाटी वादळ आणि पावसाची 63% शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दुपारी पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघाला शेवटच्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात संपूर्ण सहा विकेट घेणे आवश्यक आहे. मात्र जर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने झुंज दिली आणि खेळ दुपारपर्यंत वाढवला व पाऊस पडला, तर सामना अनिर्णित राहण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान आपण तासाभराच्या अंदाजावर एक नजर टाकली तर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत पावसाची शक्यता सुमारे 43% असेल. (स्थानिक वेळ) आणि दुपारी 2 च्या दरम्यान 63% पर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 6 नंतर 60% पावसाची शक्यता आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तर टीम इंडियाने पहिल्या डावात 327 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात त्यांना फक्त 174 धावाच करता आल्या. 200 धावांपर्यंत कमी असतानाही टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला 305 धावांचे लक्ष्य दिले ज्यामध्ये पहिल्या डावात त्यांना मिळालेल्या 130 धावांच्या आघाडीने मोठी भूमिका बजावली आहे. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅन्सन आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. तसेच लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली झाली नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 94 धावांवर 4 विकेट पडल्या असून कर्णधार डीन एल्गर सध्या 52 धावांवर नाबाद खेळत आहे.