सलामीवीर डीन एल्गर (Dean Elgar) आणि विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) यांच्या शतकी खेळीच्या मदतीने दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या तिसर्या दिवसापर्यंत पहिल्या डावात 8 बाद 385 धावा केल्या. भारताने (India) दुसऱ्या दिवशी 5 बाद 502 धावांवर डाव गोष्टीत केला. त्याच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवशी आफ्रिकेने 3 विकेट गमावत 39 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताच इशांत शर्मा याने संघाला चौथे यश मिळवून दिले आणि डोकादायक दिसणाऱ्या टेंबा बावुमा (Temba Bavuma) याला 15 धावांवर एलबीडब्ल्यू बाद करत माघारी धाडले. पण, त्यानंतर भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी- डीन एल्गार आणि फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) यांनी शतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. (IND vs SA 1st Test Day 3: रवींद्र जडेजा याने सर्वात वाईट चेंडू टाकण्याची केली पुनरावृत्ती, सोशल मीडियावर चाहते करत आहे ट्रोल Video)
बावुमा बाद झाल्यावर डु प्लेसिस फलंदाजीसाठी आला. ऐकेकाळी दक्षिण आफ्रिकी संघ मोठा स्कोर करू शकतील की नाही यावर प्रश्नचिन्ह होते, पण डु प्लेसिस आणि एल्गार यांनी महत्वाची खेळी केली. डु प्लेसिसने अर्धशतक केले आणि 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर क्विंटन डी कॉक फलंदाजीसाठी आला. यादरम्यान एल्गारने शतक पूर्ण केले. दुसरीकडे, डी कॉक आक्रमक फलंदाजी करत होता. सुरुवातीपासून डी कॉकने मोठे शॉट्स लावणे सुरु केले आणि टीम इंडियाच्या गोलंदाजांना अक्षरशः लोळवले. एल्गारने डी कॉकच्या साथीने पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली आणि संघाचा स्कोर 300 च्या पुढे नेला. एल्गारने यानंतर दीडशे धावांचा टप्पा पार केला. एल्गार आणिडी कॉक मोठ्या भागीदारीकडे वळत असताना, रवींद्र जडेजा याने एल्गरला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. एल्गार 160 धावांवर बाद झाला. त्यानंतरडी कॉकने शतक पूर्ण केले आणि 111 धावांवर रविचंद्रन अश्विन याने त्याला माघारी धाडले.
तिसऱ्या दिवसाच्याखेरीस टीम इंडियाकडे 117 धावांची आघाडी मिळाली आहे. अश्विनने 5 विकेट्स घेतल्या, जाडेजला 2 विकेट्स मिळाल्या तर इशांत शर्मा ने 1 गडी बाद केला. आणि सेनुरान मुथुसामी 12 आणि केशव महाराज 3 धावांवर खेळत आहे.