भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकी (South Africa) टीममध्ये आज तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना होणार होता. सामना धर्मशालाच्या (Dharmasala) हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये (HPCA Stadium) खेळवण्यात येणार आहे. पण, काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सामना सुरु अद्याप सुरु होऊ शकला नाही. भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 1:30 वाजता सुरु होणार होता, पण पावसाने सामना सुरु होण्यास विलंब केला. आणि तासांच्या प्रतीक्षेनंतर 50 षटकांच्या पूर्ण सामन्याशिवाय बीसीसीआयने ट्विटरवर 20 ओव्हर सामन्याची कट ऑफची माहिती शेअर केली. भारत हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार धर्मशाला आणि हिमाचल प्रदेशच्या इतर अनेक भागात दिवसभर पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. यामुळे सामना बघण्यासाठी आलेल्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. यापैकी काहींनी सोशल मीडियावर बीसीसीआयला (BCCI) फटकार लावली. (IND vs SA 1st ODI Live Score Updates: धर्मशालेत पावसाचा जोर कायम, भारत-दक्षिण आफ्रिका पहिली वनडे रद्द होण्याची शक्यता)
ट्विटरवर शेअर केलेल्या माहितीनंतर चिंतातुर चाहते बीसीसीआय सामन्याचे वेळापत्रक बनवण्यापूर्वी घटनास्थळाचे वातावरण विचारात घेते का, असे म्हणत निराशा व्यक्त केली. पाहा काही प्रतिक्रिया:
अशी जागा का?
Aisi jagah hi kyu match rkhte h itni bdi country h .... Kahi bhi rakh do 😡😡#INDvSA https://t.co/9BQEbQTZB8
— 🇮🇳 🇮🇳 Rhe Thakur 🇮🇳 🇮🇳 (@imRheaT) March 12, 2020
त्रासदायक
why do @BCCI keep matches at such a venue where it is already predicted that it will rain.
Its so irritating.#INDvSA
— Ayush (@_ayush_jainn) March 12, 2020
या महिन्यात धर्मशाला का?
Why do you have to choose Dharamshala at this time of month. #INDvSA
— Aditya Saha (@adityakumar480) March 12, 2020
हवामान अहवाल पहा
See the weather report mad bcci
— Anjani Kumar Sharan (@AnjaniK78857255) March 12, 2020
बीसीसीआय पर्यटन कंपनीत बदलणार आहे
If you won't consider weather factors in scheduling matches soon BCCI will turn into tourism company.
— farrukh adil baig (@dubaidreams7) March 12, 2020
ठिकाण बदलले का नाही
When you are know that the rain will take place in Dharamshala then why you consider it here you have change the venue or not
— Devesh Singh chauhan (@DeveshS88733000) March 12, 2020
दोन्ही देशातील क्रिकेटपटू कोरोनाव्हायरसच्या उद्रेकात आमने-सामने येण्यास सज्ज आहे. भारतासाठी सध्या ही मालिका महत्वपूर्ण आहे. न्यूझीलंडमध्ये भारताला यापूर्वी वनडे मालिकेत क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते. शिवाय, कर्णधार विराट कोहली देखील फॉर्ममध्ये नसल्याने टीमच्या चिंतेत भर पडली आहे. या मालिकेद्वारे विराट फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकी टीमचा सामना करणे त्यांना सोप्पे जाणार नाही. त्यांनी नुकतंच घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केला.