भारत-दक्षिण आफ्रिकामध्ये धर्मशालामध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्यात पावसाने खलनायकाची भूमिका बजावली आणि सामना रद्द करण्यात आला. यामुळे सामन्याची आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या चाहत्यांनी मात्र चांगलीच निराशा झाली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यावर दोन्ही संघ आता 15 मार्च रोजी लखनऊमध्ये खेळला जाईल.

कोविड-19 च्या धोक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील उर्वरित दोन सामनेरिक्त स्टेडियममध्ये खेळण्याची शक्यता आहे, बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले.

कोविड-19 च्या धोक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील उर्वरित दोन सामनेरिक्त स्टेडियममध्ये खेळण्याची शक्यता आहे, बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले.

धर्मशालेत भारत-दक्षिण आफ्रिकामधील सामना सुरु होण्यास पावसामुळे उशीर होत आहे. पूर्ण खेळ होण्याची शक्यता नसून 20 ओव्हरचा खेळ होण्यासाठी 6:30 वाजेपर्यंतही मुदत वाढ आहे. धर्मशालेत अजूनही पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे या वेळेपर्यंत सामना सुरु झाला नाही तर सामना रद्द केला जाऊ शकतो. 

20 ओव्हरच्या सामन्यासाठी कट ऑफ वेळ संध्याकाळी 6:30 वाजता आहे. तोपर्यंत पाऊस थांबला नाही तर सामना रद्द केला जाईल.

जेव्हा सर्व ठीक दिसत होते, कव्हर्स काढून टाकले जात होते आणि आम्ही नाणेफेक बद्दल अधिकृत घोषणा अपेक्षित होती, काळे ढग परत आले आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. यामुळे पूर्ण वेळेचा खेळ होणे मुश्किल आहे कारण आधीच बराच वेळ व्यर्थ गेला आहे. 

धर्मशालेत पाऊस आत्तासाठी थांबला आहे, आणिग्राउंडस्टॅफने कव्हर काढण्याची वाट पहिली जात आहे. धर्मशालेत गोष्टी नुकत्याच साफ होऊ लागल्या आहेत. अधिकृत तपासणीनंतर खेळपट्टीवरून कव्हर्सदेखील काढले गेले आहे. आणि आता थोड्याच वेळात टॉस होणे अपेक्षित आहे.

धर्मशालेत पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे त्यामुळे टॉसला अजून उशीर होत आहे. त्यामुळे आज भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील पहिल्या वनडे सामन्याला उशिराने सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

धर्मशाळेत टॉसला उशीर झाला आहे. पुढील तपासणी 1.15 वाजता IST वाजता होईल. धर्मशालेत आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. सकाळपासून शहरात पाऊस पडत आहे.

आज धर्मशाळेचा हवामान अंदाज तितकासा चांगला नाही. आशा आहे की पाऊस दूर राहील आणि दोन्ही संघात संपूर्ण खेळ होईल. टॉस थोड्याच वेळात होईल.

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही देशांमधील मधील पहिला एकदिवसीय सामना दुपारी दीड वाजल्यापासून धर्मशालामध्ये सुरु होईल. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत पराभवामुळे टीम इंडियावर दबाव असेल आणि 3 सामन्यांच्या वनडे आणि त्यानंतर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचे झाले तर संघ पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरेल कारण त्याआधी त्यांनी एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाला 3-0 ने पराभूत केले आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पावसाने व्यत्यय आणल्यास DLS नियमाचा वापर केला जाऊ शकतो. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

यापूर्वी भारत-दक्षिण आफ्रिकामध्ये सप्टेंबर महिन्यात याच मैदानावर अखेरचा टी-20 सामना खेळला गेला होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पावसामुळे सामना खराब होऊ शकतो. सामन्यावर कोरोना विषाणूचेही संकट आहे, जेणेकरून बीसीसीआयने सर्व खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. टीम इंडियामध्ये दुखापतीतून परतलेले हे तीन खेळाडू पुनरागमन झाले असून त्यात भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांचा समावेश आहे.

असा आहे भारत-दक्षिण आफ्रिका संघ

भारत: शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (कॅप्टन), टेंबा बावुमा, रस्सी वैन डेर ड्यूसेन, फाफ डु प्लेसिस, काइल वेरिन, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, आदिले फेहलुकवायो, लुंगी एनगीडी, लुथो सिपमला, ब्युरन हेन्ड्रिक्स, एनरिच नॉर्टजे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज.