भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs PAK Women's World Cup 2022, Live Cricket Streaming: भारतीय महिला संघ (India Women's Team) उद्या, म्हणजे रविवारपासून विश्वचषक 2022 स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकच्या (Women's World Cup) आपल्या पहिल्याच टीम इंडियाचा (Team India) सामना पाकिस्तानशी  (Pakistan) होणार आहे. पुरुष संघाप्रमाणेच महिला संघाचा पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघ आतापर्यंत दोन वेळा विश्वचषकात आमनेसामने आले असून दोन्ही वेळी भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध ही विक्रमी विजयी घोडदौड सुरु ठेवण्याच्या उद्देशाने टीम इंडियाची कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय प्रेक्षक भारत-पाकिस्तान हा ‘महामुकाबल्या’चे लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि थेट टेलिकास्ट कुठे व कसे पाहू शकतात याची तपशीलवार माहिती खालीलप्रमाणे आहे. (IND-W vs PAK-W: विश्वचषकात पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान, पुरुषांप्रमाणे महिला संघाचा राहिला एक हाती दबदबा; पहा हेड-टू-हेड रेकॉर्ड)

भारत आणि पाकिस्तान महिला विश्वचषकाचा हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. आयसीसी महिला विश्वचषक 2022 मधील भारत महिला विरुद्ध पाकिस्तान महिला यांच्यातील सामना बे ओव्हल, माउंट मौनगानुई येथे खेळला जाणार आहे. भारतीय प्रेक्षकानासाठी भारत-पाकिस्तान सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध भाषांमध्ये थेट प्रसारित केला जाईल. तसेच जर तुम्ही महिला विश्वचषक 2022 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान महिला विश्वचषक सामना आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर पाहत असाल तर Disney+ Hotstar अॅप व वेबसाइटवर याचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

भारत महिला संघ: मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव. स्टँडबाय खेळाडू: एस मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादूर.

पाकिस्तान महिला संघ: बिस्मा मारूफ (कर्णधार), निदा दार (उपकर्णधार), ऐमन अनवर, आलिया रियाझ, अनम अमीन, डायना बेग, फातिमा सना, गुलाम फातिमा, जवेरिया खान, मुनीबा अली, नाहिदा खान, नश्रा संधू, ओमामा सोहेल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक).स्टँडबाय खेळाडू: इरम जावेद, नजीहा अल्वी आणि तुबा हसन.