(Image Credit: Ranveer Singh Twitter)

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंघ (Ranveer Singh) नेहमीच आपल्या अतरंगी अंदाजासाठी चर्चेत राहिला आहे. आपल्या वागण्यावरून, कपड्यांवरून अनेकदा तो ट्रोल ही झाला आहे. मात्र यात आता एका वादाची भर पडली आहे. भारत (India) -पाकिस्तान (Pakistan) विश्वकप सामन्यानंतर रणवीर ने अनेक खेळाडूंसह फोटोज शेअर केले होते. यात विराट कोहली, शिखर धवन (Shikhar Dhawan), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचा समावेश आहे. हार्दिक सोबत रणवीर ने जो फोटो शेअर केला त्याला त्याने कॅप्शन दिले 'ईट, स्लीप, डोमिनेट, रिपीट' (Eat, Sleep, Dominate, Repeat). नाव आहे हार्दिक, हार्दिक पंड्या.' याच ट्विटमुळे रणवीर सिंघ अडचणीत सापडला आहे. (ट्विटर वर 30 मिलियन्स फॉलोअर्स झाल्यानंतर विराट कोहली याने दिली अशी रिअॅक्शन Watch Video)

रणवीरच्या याच ट्विट वर WWE स्टार ब्रॉक लेस्नर (Brock Lesnar) चा व्यवस्थापक आणि वकील पॉल हेमन (Paul Heyman) यांनी रणवीरवर चक्क चोरीचा आरोप केला आहे. 'काय तु गंमत करत आहेस का? ईट, स्लीप, कॉन्कर, रिपीट असतं. याचे कॉपीराईट हक्क ब्रॉक लेस्नरकडे आहेत. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहे. ईट, स्लीप, डिपॉजीशन, रिपिट'.

'ईट, स्लीप, कॉन्कर, रिपीट' हा लेस्नरच्या लढतीआधीचा स्लोगन आहे. रिंगमध्ये उतरताना तो हा स्लोगन रिपीट करतो. लेस्नरने 2014 मध्ये अंडरटेकरच्या सलग विजयाचा विक्रम मोडल्यानंतर या स्लोगनचा वापर करायला सुरूवात केली होती. त्याने त्याच्या शर्टावर सुद्धा हा स्लोगन लिहून घेतला आहे.