IND vs NZ WTC Final 2021: केन विल्यमसनने जिंकला टॉस, पहिले घेतला बॉलिंगचा निर्णय; हे 11 किवी भारताला देणार टक्कर
केन विल्यमसन आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: साउथॅम्प्टन (Southampton) येथे पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील बहुप्रतीक्षित आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याचा शुभारंभ झाला आहे. 18 जून, पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यामुळे 19 जूनपासून सुरु झालेल्या सामन्यात किवी कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) नाणेफेक जिंकली आणि पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने यापूर्वीच आपला प्लेइंग इलेव्हन घोषित केला होता पण किवी संघाने आज पावसानंतर खेळपट्टीचे निरीक्षण केल्यावर अंतिम 11 खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. दोन्ही देशांचे खेळाडू आणि क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत होते, पण पहिल्याच दिवशी त्यांची निराशा झाली ज्यामुळे दिवसाच्या सुरुवातीचे पहिले सत्र वाया गेले होते.

न्यूझीलंडच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर विल्यमसन पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत परतला आहे. टॉम लाथम आणि डेव्हन कॉनवेची जोडी सलामीला उतरेल. विशेष म्हणजे पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्यार्व न्यूझीलंडने सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकाही फिरकीपटूचा समावेश केलेला नाही आहे. यापूर्वी किवी संघात एजाज पटेलला एमकेव फिरकी गोलंदाज म्हणून संधी मिळाली होती पण परिस्थिती पाहता त्याला अंतिम-11 स्थान मिळवता आले नाही. तसेच. कॉलिन डी ग्रँडहोम, काईल जेमीसन, नील वॅग्नर, साउदी आणि बोल्ट या वेगवान गोलंदाजांचा समावेश झाला आहे. जेमीसन आणि साउदी आपल्या स्विंग व वेगाने भारतीय फलंदाजांना त्रास देऊ इच्छित असतील. दुसरीकडे, सामन्यापूर्वीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केलेल्या भारताने कोणताही बदल केलेला नाही आहे. रवींद्र जडेजा व आर अश्विन हे दोघे फिरकीपटू संघात कायम आहेत.

पाहा भारत-न्यूझीलंडचा प्लेइंग इलेव्हन

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम लाथम, डेव्हन कॉनवे, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॅटलिंग (विकेटकीपर), कॉलिन डी ग्रँडहोम, काईल जेमीसन, नील वॅग्नर, टिम साउदी आणि ट्रेंट बोल्ट.