आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये आज सेमीफायनलमध्ये आज भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात लढत होत आहे. सध्या पावसामुळे सामना थांबला आहे. त्यातच आणखी तीन तास पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने या दोन संघातील सामना राखीव ठेवण्यात आला आहे. सामन्याचा आजचा खेळ स्थगित झाल्याची पंचांची घोषणा केली. उर्वरीत सामना हा उद्या बुधवारी दुपारी 3 वाजता खेळवण्यात येणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना मँचेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) मैदानावर खेळाला जात आहे. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये कॉलिन मुनरो ने असे काही केले जे बघून तुम्ही देखील आनंदी व्हाल, पहा Photo)

दरम्यान न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकत पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दोन ओव्हर निर्धाव टाकल्यानंतर जसप्रीत बुमराह ने न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल याला बाद केले. गुप्टिल 1 धाव करून माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजाने हेन्री निकोलसला 28 धावांवर बाद केले. चहलनं कर्णधार विल्यम्सनला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. 44 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 200चा आकडा पार केला. तर, कॉलिन डी ग्रॅण्डहोम 16 धावांवर बाद झाला.

दरम्यान, आयसीसीकडून सेमीफायनल सामन्यांसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळं भारत-न्यूझीलंड सामना दुसऱ्या दिवशी 46.1 ओव्हरपासून सुरु होईल. पण, जर बुधवारी देखील पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर भारतीय संघ थेट फायनल मध्ये पोहचेल. कारण गुणतालिकेत न्यूझीलंडचे 11 गुण असून टीम इंडियाचे सर्वाधिक 15 गुण आहेत.