IND vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध ‘या’ पाच खेळाडूंवर खेळाडूंवर मोठी जबाबदारी, निर्णायक खेळीने करतील भारताची नौका पार
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

T20 World Cup 2021: विराट कोहलीची टीम इंडिया (Team India) आणि केन विल्यम्सनच्या न्यूझीलंड (New Zealand) संघ गट 2 मधील आपला दुसरा सामना रंगणार आहे. पाकिस्तानविरुद्ध दोन्ही संघांना सलामीच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहायला लागले आहे. त्यामुळे आगामी सामना दोघांसाठी महत्वाचा असणार आहे. सेमीफायनलच्या दिशेने पाकिस्तान फक्त काही पावले दूर आहे तर भारत आणि न्यूझीलंडला उर्वरित चार सामने जिंकण्याची गरज आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघ (Indian Team) रविवारी न्यूझीलंडशी भिडणार आहे. हा सामना जिंकण्याच्या निर्धाराने टीम इंडिया दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उतरणार आहे. जो कोणता संघ हा सामना गमावेलं त्याचा स्पर्धेतील पुढचा प्रवास खूप कठीण होईल. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या पुढील सामन्यात सर्वांच्या नजरा खेळाडूंवर असतील. हे पाच खेळाडू आपल्या धमाकेदार खेळीने भारतीय संघाची नौका पार लगावु शकतात. (IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध संघात ‘या’ तडाखेबाज खेळाडूंची एन्ट्री, केन विल्यमसनच्या अडचणीत वाढ)

रोहित शर्मा (Rohit Sharma)

हिटमॅन रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यामुळेच भारताची सुरुवात खराब झाली आणि संघाला सामना गमवावा लागला. रोहितचा किवींविरुद्ध शानदार रेकॉर्ड आहे. याशिवाय संघासाठी विजय गरजेचं असल्याने हिटमॅनला सर्वोत्तम खेळी करणे गरजेचे आहे जेणेकरून संघाच्या खात्यात पहिला विजय पडेल.

विराट कोहली (Virat Kohli)

कर्णधार कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 57 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, ज्यामुळे संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारली. या सामन्यात विराट कोहली टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध सामन्यात बाद झाला. पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी फॉर्म कायम ठेवण्याचे कोहलीपुढे आव्हान असेल. न्यूझीलंडविरुद्ध कोहलीवर संघाच्या विजयाची जबाबदारी असेल.

रिषभ पंत (Rishabh Pant)

युवा विकेटकीपर-फलंदाज पंतने पाकिस्तानविरुद्ध 39 धावांची ताबडतोड डाव खेळला. पंतकडून मधल्या फळीत संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. याशिवाय सध्या हार्दिक पांड्या देखील लयीत नसल्याने त्याच्यावरील जबाबदारी वाढली आहे. अंतिम क्षणी संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून देण्याची पंतवर असेल.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजालाही पाकिस्तानविरुद्ध बॉल आणि बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडविरुद्ध तो महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. जर तो चेंडू आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करू शकला तर त्याचा संघासाठी खूप फायदा होईल.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

स्टार वेगवान गोलंदाज बुमराह संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याला एकही विकेट मिळाली नाही. तसेच त्याने 3 षटकात 22 धावा लुटल्या. बुमराहसाठी न्यूझीलंडविरुद्ध प्रभावी खेळी करणे खूप महत्त्वाचे आहे. बुमराहने चांगली कामगिरी केल्यास संघाला विजय मिळवणे सोपे होईल.