IND vs NZ ICC WTC Final 2021 Live Streaming and TV Telecast: भारत विरूद्ध न्युझिलंड सामन्याचं  DD Sports Channel 1 वर पहा थेट प्रक्षेपण
विराट कोहली आणि केन विल्यमसन (Photo Credit: Instagram)

डीडी स्पोर्ट्स चॅनल 1 आज (18 जून) पासून सुरू होणार्‍या भारत (India) विरुद्ध न्युझिलंड (New Zeland) च्या आयसीसी टेस्ट वर्ल्ड कप फायनल्सचं (ICC WTC Final) टेलिकास्ट करणार आहे. त्यामुळे भारतामध्ये क्रिकेट चाहत्यांना डीडी वर मॅच पाहता येणार आहे आणि फ्री डिश चे युजर्स ऑल इंडिया रेडिओ वर या मॅचची कॉमेट्री देशभरात ऐकू शकणार आहेत. डीडी स्पोर्ट्सच्या सोबतीने ऑल इंडिया रेडिओ कॉमेट्री DD FreeDish DTH Satellite Radioवर देखील उपलब्ध आहे.

देशात भारत विरुद्ध न्युझिलंड ची कॉमेंट्री ऐकण्यासाठी All India Radio’s FM Rainbow Channels, FM Local Radio Stations (LRS), Digital Radio Transmitters (DRM) आणि Additional FM Transmitters वर सोय उपलब्ध आहे. नक्की वाचा: ICC World Test Championship 2021 Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघ जाहीर, हे '11' खेळाडू देणार न्यूझीलंडच्या संघाला टक्कर.

आजपासून 22 जून पर्यंत युकेच्या Rose Bowl Stadium वर भारत विरूद्ध न्युझिलंडचा सामना रंगणार आहे. विजेता संघ World Test Championship trophy जिंकणारा पहिला संघ होऊन इतिहास रचणार आहे. आज भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता टॉस होईल आणि 3.30 पासून सामना सुरू होणार आहे.