
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारतीय (India) राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च (रविवार) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम(Dubai International Cricket Stadium), दुबई येथे खेळला जाईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने वरचढ कामगिरी केली. 2000च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि 2021 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. Champions Trophy 2025 Final: फायनलमध्ये विराट-रोहित नाही; 'हा' खेळाडू ठरेल गेम चेंजर, आर अश्विनने केली मोठी भविष्यवाणी
भारताच्या विजयाचा अंदाज
अंतिम सामन्यापूर्वी, प्रसिद्ध ज्योतिषी सुमित बजाज यांनी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्यांनी असेही म्हटले की हा सामना भारतासाठी आतापर्यंतचा सर्वात कठीण सामना असू शकतो. आयसीसीच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा संघ नेहमीच भारतासाठी आव्हानात्मक राहिला आहे आणि यावेळीही तो पूर्ण तयारीने मैदानात उतरेल.
टीम इंडियाचे संतुलित संयोजन
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर मिळालेल्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल आणि केएल राहुल हे उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. तर मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे गोलंदाजी आक्रमण मजबूत करत आहेत.
टीम इंडिया इतिहास बदलू शकेल का?
यावेळी भारतीय संघाकडे न्यूझीलंडविरुद्धच्या जुन्या पराभवाचा बदला घेण्याची आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. जर भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हे विजेतेपद जिंकले तर स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ होण्याचा मान त्यांना मिळेल.