IND vs NZ 5th T20I: विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी कामगिरी, पाहा पाचव्या टी-20 मध्ये बनलेले 'हे' रेकॉर्डस्
विराट कोहली, रोहित शर्मा (Photo Credit: IANS)

5 सामन्यांच्या टी -20 मालिकेचा शेवटचा सामना भारत (India) आणि यजमान न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात बे ओव्हल, माउंट मौंगानुई येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दिलेल्या 164 धावांच्या प्रत्युत्तरात किवी संघाला 156 धावांपर्यंतच मजल मारता आली. यजमान न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने मालिकेत 5-0 असे पराभूत केले. टी-20 मालिका संपल्यानंतर आता 3 सामन्यांची वनडे मालिका दोन्ही देशांमध्ये सुरू होईल, ज्याचा पहिला सामना 5 फेब्रुवारी रोजी हॅमिल्टनमध्ये खेळला जाणार आहे. मालिकेच्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून 163 धावा केल्या. (IND vs NZ 5th T20I: टीम इंडिया 7 धावांनी विजयी, न्यूझीलंडचा 5-0 ने क्लीन स्वीप करत रचला इतिहास)

दरम्यान, या पाचव्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा, केएल राहुल, रॉस टेलर यांनी विक्रमी कामगिरीची नोंद केली. जाणून घ्या:

1. 50 पेक्षा जास्त धावा काढत रोहितने विराट कोहलीला मागे टाकले आहे. रोहितने 25 वेळा 50 किंवा अधिक धावा केल्या आहेत, तर विराटनार 24 वेळा 50 किंवा अधिक धावा केल्या आहेत.

2. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत केएल राहुलने एकूण 224 धावा केल्या आहेत. कोणत्याही द्विपक्षीय टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम कोहलीच्या नावावर होता, ज्याने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 199 धावा केल्या होत्या.

3. या संपूर्ण मालिकेत न्यूझीलंडचा कोणताही गोलंदाज मनीष पांडेला बाद करू शकला नाही. म्हणजेच ते संपूर्ण मालिकेत नाबाद परतला आहे. मनीष आजवर सलग आठ डावांमध्ये नाबाद आहे. हा एक अद्भुत रेकॉर्ड आहे.

4. न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टीम सेफर्टने आज आंतरराष्ट्रीय टी-20 कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने तीनही अर्धशतके भारताविरुद्ध केली आहेत.

5. 5-टी -20 सामन्यांची मालिका 5-0 अशी जिंकणारा भारत जगातील पहिला संघ ठरला. आणि कसोटी न खेळणार्‍या देशांसह न्यूझीलंड पाच मालिकांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक टी-20 गमावणारा पाचवा संघ बनला आहे.

6. शोएब मलिक आणि रोहितच्यानंतर रॉस टेलर 100 टी-20 सामना खेळणारा तिसरा, तर पहिला किवी खेळाडू बनला आहे.

7. आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहने विश्वविक्रमाची नोंद केली आहे. बुमराह आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला.

8. भारतीय संघाचा अष्टपैलू शिवम दुबेनेआंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात महागडी ओव्हर टाकली. ज्यामध्ये शिवमने एकूण 34 धावा लुटवल्या. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एका ओव्हरमध्ये सर्वाधिक 36 धावा करण्याचा लज्जास्पद विक्रम नोंदवला होता.

9. रविवारी कर्णधार म्हणून पुनरागमन करत अखेरच्या सामन्यात विश्रांती घेतलेल्या रोहितने शोएब मलिकनंतर 100 वा टी-20 डाव खेळत आणखी एक टप्पा गाठला.शोएबने आजवर105 टी-20 डाव खेळले आहेत.

न्यूझीलंड संघ या सामन्यात चांगली सुरुवातीचा फायदा घेण्यात अपयशी ठरला आणि सामना 7 धावांनी गमावला. एकेवेळी त्यांनी 17 धावांवर 3 गडी गमावले होते, मात्र नंतर अनुभवी रॉस टेलर आणि यष्टीरक्षक टिम सिफर्ट यांच्यात चांगली भागीदारी होती. टेलरने 53 आणि सेफर्टने 50 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने 3 आणि शार्दुल ठाकूरने 2 गडी बाद केले. आणि न्यूझीलंडला घरच्या मैदानावर पहिल्यांदा क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले.