न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) टीम इंडिया (India) सध्या हॅमिल्टनच्या सेडन पार्क मैदानावर तिसरा टी-20 सामना खेळत आहे. या सामन्यात किवी कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकला आणि भारताला पहिले फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. या सामन्यात भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठणारा रोहित देशाचा चौथा क्रिकेटपटू ठरला. हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या टी-20 दरम्यान त्याने ही कामगिरी केली. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग यांनी यापूर्वी ही कामगिरी बजावली आहे. रोहितने डावाच्या 6 व्या षटकात षटकार खेचला आणि विक्रमाची नोंद केली. हा टप्पा गाठणारा रोहित दुसरा वेगवान सलामी फलंदाज ठरला. रोहितने 219 डाव, तर सचिन ने 214 डावात ही कामगिरी केली आहे. (IND vs NZ 3rd T20I: हॅमिल्टन टी-20 सामन्यात विराट कोहली बनणार No 1 कर्णधार, एकाच वेळी मोडू शकतो 'हे' 3 मोठे रेकॉर्डस्)
रोहितला यापूर्वी झालेल्या पहिल्या दोन्ही सामन्यात संघर्ष करावे लागले. तो जास्त धावा करू शकला नाही, मात्र आजच्या सामन्यात त्याने संयमाने फलंदाजी केली आणि अर्धशतकी खेळी करून 65 धावा करून पॅव्हिलिअनमध्ये परतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहितनंतर केवळ तीन फलंदाज 10,000 किंवा त्याहून अधिक धावा करू शकले आहेत. शिवाय, आजच्या सामन्यात दोन षटकार मारत रोहितने ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नरला पिछाडीवर टाकले. वॉर्नरने टी-20 मध्ये 356 षटकार मारले आहेत, तर आजच्या सामन्यात रोहितने एकूण 3 षटकार मारले.
Milestone Alert - Rohit Sharma now has 10K international runs as an opener 👏👏
HITMAN on the go 💪 pic.twitter.com/cVUXdOeWut
— BCCI (@BCCI) January 29, 2020
तिसरा टी-20 सामना जिंकल्यास न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडिया इतिहास रचेल. या सामन्यात विजयासह भारत न्यूझीलंडच्या भूमीवर किवीविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकण्याची भारताची पहिलीच वेळ असेल. न्यूझीलंडमध्ये खेळत टीम इंडिया आजवर एकही द्विपक्षीय टी-20 मालिका जिंकू शकला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात यापूर्वी फक्त दोन द्विपक्षीय टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत. या दोन्हीमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.