IND vs NZ 3rd ODI: न्यूझीलंडचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; टीम इंडियातून केदार जाधव Out, मनीष पांडे In
विराट कोहली, केन विल्यमसन

भारत (India) आणि यजमान न्यूझीलंड (New Zealand) संघात तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम वनडे सामना थोड्याच वेळात माउंट मौंगानुईच्या बे ओव्हल मैदानात खेळला जाईल. सामन्यापूर्वी झालेल्या टॉस दरम्यान किवी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून न्यूझीलंडने मालिका खिशात घातली आहे, त्यामुळे टीम इंडियासमोर आता क्लीन स्वीपचे संकट उभे आहे. आजच्या सामन्यासाठी भारत-किवीच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये दोन बदल झाले आहे. कर्णधार विलियम्सन आणि मिशेल सॅटनर (Mitchell Santner) परतले असून, मार्क चैपमैन आणि टॉम ब्लंडेलला बाहेर करण्यात आले आहे. दुसरीकडे, केदार जाधव (Kedar Jadhav) याला बाहेर करून मनीष पांडे (Manish Pandey) याचा समावेश करण्यात आला आहे. (IND vs NZ 3rd ODI Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लाथम याने किवींचे नेतृत्व केले होते. दोन्ही देशांमध्ये पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली होती, त्यामुळे मालिकेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्याचा दोन्ही संघ पूर्ण प्रयत्नात असतील. न्यूझीलंडविरुद्ध आजच्या सामन्यात टीम इंडियासमोर स्वीप टाळण्याचे मोठे चॅलेंज असेल. यापूर्वी, 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाने किवी संघाचा त्याच्याच घरात 5-0 ने क्लीन स्वीप केला होता. टी-20 मालिकेत जोरदार प्रदर्शन केल्यावर टीम इंडियासमोर आता वनडेमध्ये क्लीन स्वीपचे संकट दिसत आहे. भारताच्या अव्वल फलंदाजांमधील पहिले दोन्ही फलंदाज, पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल फ्लॉप ठरले. आता अखेरच्या सामन्यात टेस्ट मालिके आगोदर या दोघांना त्यांचा खेळ उंचावण्याची संधी असेल.

असा आहे तिसऱ्या वनडेसाठी भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन

भारत: पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनी.

न्यूझीलंड: मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, केनविल्यमसन(कॅप्टन), रॉस टेलर, टॉम लाथम, जिमी नीशाम, कोलिन डि ग्रैंडहोम, टिम साऊथी, काइल जैमीसन, मिशेल सॅटनर आणि हामिश बेनेट.