भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Twitter/ICC)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध तिसर्‍या आणि अंतिम वनडे सामन्यात भारतीय संघाला (Indian Team) व्हाईटवॉश टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कर्णधार केन विल्यमसन याला दुखापतीमुळे सामन्याला मुकावे लागले असले तरी यजमानांनी टी-20 मालिकेत लाजीरवाणा पराभवानंतर यजमान संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आणि मालिका खिशात घातली. टी-20 मालिका भारताने 5-0 ने जिंकली पण वनडे मालिकेत परिस्थिती पूर्णपणे उलट झाली. भारताने 2019 मध्ये वनडे मालिका 4-1 अशी जिंकली, पण टी-20 मालिकेत 2-1 ने पराभवाला सामोरे जावे लागले. 2014 मध्ये येथे भारतीय (India) संघाने वनडे मालिका 4-1 ने गमावली होती.  टी-20 मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या भारताला यंदा वनडेमध्ये पूर्णपणे फ्लॉप सिद्ध झाली आणि पहिल्या दोन्ही सामन्यात किवीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. (Video: सचिन तेंडुलकर याने 5 वर्षानंतर केली बॅटिंग; बुशफायर बॅशमध्ये एलिसे पेरी, अ‍ॅनाबेल सदरलँडविरुद्ध दाखवला दम)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वनडे सामन्यांच्या मालिकेचा तिसरा सामना मंगळवारी (11 फेब्रुवारी) माउंट मौंगानुईच्या बे ओव्हल स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सामना सकाळी 7.30 वाजता सुरू होईल आणि टॉस अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7.00 वाजता होईल. आपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर वनडे सामन्याचे थेट प्रसारण आणि हॉटस्टारवर पाहिला जाऊ शकतो.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली, पण गोलंदाजांनी धावा लुटवल्या परिणामी भारताला सामना गमवावा लागला. दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांनी भारताची फलंदाजी पूर्णपणे उध्वस्त केली. तिसर्‍या सामन्यात भारताला फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणात सुधार करणे आवश्यक आहे.

भारत वनडे टीम: केएल राहुल (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, पृथ्वी शॉ, कुलदीप यादव, ऋषभ पंत, शार्दुल ठाकुर.

न्यूझीलंड वनडे टीम: मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, टॉम लाथम (कॅप्टन/विकेटकीपर), मार्क चैपमैन, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिशेल सॅटनर, टिम साउथी, हामिश बेनेट, ईश सोढी, टॉम ब्लंडेल, काइल जैमिसन, स्कॉट कुग्गेलैन.