पृथ्वी शॉ (Photo Credit: IANS)

भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) मध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल मैदानात खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या दुपारच्या जेवणाची घोषणा झाली आहे. या वेळेपर्यंत भारताने 2 विकेट गमावून ओव्हरमध्ये धावा केल्या आहेत. भारताकडून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 15 आणि विराट कोहली (Virat Kohli) नाबाद 3 धावा करून खेळत आहेत. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियामायनने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 54 आणि मयंक अग्रवाल 7 धावा करून लंच पूर्वीच बाद झाले. ट्रेंट बोल्ट आणि काईल जैमीसन यांनी भारताला दोन झटके दिले. (IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडने जिंकला टॉस, टीम इंडियाची पहिले बॅटिंग; इशांत शर्मा-आर अश्विन Out)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीनंतर भारताकडून पुन्हा एकदा पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालच्या जोडीने डावाची सुरुवात केली. पृथ्वीने पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केली, पण मयंक त्याला योग्य साथ देऊ शकला नाही. आणि 30 च्या धावसंख्येवर भारताने पहिली विकेट गमावली. बोल्टने मयंकला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर पृथ्वी आणि पुजारामध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. या दरम्यान, पृथ्वीने यंदाच्या दौऱ्यावरील पहिले अर्धशतक ठोकले. पृथ्वीने 61 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक करून पृथ्वी टॉम लाथमकडे कॅच आऊट झाला. पृथ्वीच्या टेस्ट करिअरमधील हे दुसरे अर्धशतक होते.

या सामन्यासाठी भारताने मागील सामन्यातून प्लेयिंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. दुखापतग्रस्त इशांत शर्माच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संधी देण्यात आली आहे, तर फलंदाजी वाढविण्याच्या उद्देशाने रविंद्र जाडेजाला आर अश्विनच्या जागी स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघात एक बदल झाला आहे. एजाज पटेलच्या जागी वेगवान गोलंदाज नील वॅग्नरला संधी मिळाली आहे.