IND vs NZ 2nd Test: क्राइस्टचर्चमध्ये टीम इंडियासमोर क्लीन स्वीपचे संकट, न्यूझीलंडला प्लेयिंग इलेव्हनमध्ये होऊ शकतात 'हे' 3 बदल
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना शनिवार, 29 फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्च (Christchurch) मध्ये खेळला जाईल. पहिल्या सामन्यात भारताला लज्जास्पद 10 विकेटने प्रभावाला सामोरे जावे लागले होते. एकही भारतीय खेळाडू अपेक्षेप्रमाणे खेळ करू शकला नाही. त्यामुळे, टीम इंडिया बॅकफूटवर असताना कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुसर्‍या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याचा विचार करत असेल. आणि त्याने संघात तीन किंवा अधिक बदल केल्याने आश्चर्य वाटणार नाही. यामध्ये तो एक फलंदाजाशिवाय अतिरिक्त गोलंदाजांचा समावेश करू शकतो. न्यूझीलंड दौऱ्यावर सलग दुसऱ्या क्लीन स्वीपच्या उंबरठ्यावर असलेली टीम इंडिया व्हाईट वॉश टाळण्याचा सर्वतोपरीने प्रयत्न करेल. (IND vs NZ Test 2020: क्राइस्टचर्च टेस्टआधी टीम इंडियाला मोठा धक्का; पृथ्वी शॉ च्या खेळण्यावर संशय, 'हे' आहे कारण)

29 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या क्राइस्टचर्च कसोटी सामन्यासाठी भारत प्लेयिंग इलेव्हनमध्ये करू शकणारे 3 बदल येथे पहा:

पृथ्वी शॉ आऊट, शुभमन गिल इन

शुबमन गिल बऱ्याच वेळापासून भारताच्या कसोटी संघाचा दरवाजा ठोठावत आहे आणि त्याला क्राइस्टचर्च येथे दुसर्‍या कसोटीत संधी देण्याची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यात पृथ्वीला पसंती देण्यात आल्याने गिलला टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली नाही. शिवाय, पृथ्वी पहिल्या सामन्यात सर्वोत्तम खेळही करू शकला नाही. त्यामुळे, गिलला फलंदाजीची क्षमता दाखविण्याची एक संधी द्यावी असे एखाद्याचे मत आहे, खासकरुन जेव्हा रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे.

हनुमा विहारीच्या जागी रवींद्र जडेजा

पहिल्या सामन्यात कोहलीने सात फलंदाज आणि चार गोलंदाजांचा समावेश असलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. दुर्दैवाने त्याला यशस्वी झाले नाही आणि म्हणूनच त्याने पाच गोलंदाज खेळले पाहिजेत, त्यातील एक रवींद्र जडेजा असला पाहिजे. जडेजा आणि रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीने भारताला बर्‍याच वेळा बऱ्याच वेळा मुश्किल स्थितीतून बाहेर काढले आहे आणि दुसऱ्या सामन्यात हा एक विश्वासार्हप्रयत्न होईल. जडेजा हा एक विश्वासार्ह कसोटी फलंदाजदेखील आहे आणि तो मैदानावर मुश्किल स्थितीत काय करू शकतो हे सांगण्याची गरज नाही.

रिषभ पंतच्या जागी रिद्दीमान साहा

पंत आणि साहामधील चर्चा काही काळापासून सुरु आहे. पहिल्या कसोटीत पंतची साहाच्यावर निवड केल्याने बरेच लोकं आश्चर्यचकित झाले कारण साहाने विशेषतः स्टम्पच्या मागे कसोटी सामन्यात उत्तम कामगिरी केली आहेत. म्हणूनच, वेलिंग्टनमध्ये पंतने केलेल्या फलंदाजासह सरासरी कामगिरीनंतर साहाला दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे समर्थनार्थ असेल. साहा सध्याच्या क्षणी जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपर आहे आणि क्राइस्टचर्चमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात त्याला संधी मिळण्यास पात्र आहे.

दोन्ही देशांमधील सामन्यात भारताला वेलिंग्टनमध्ये 10 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले होते. आणि आता दुसऱ्या सामन्यात त्यांच्यासमोर अजून एका क्लीन स्वीपचे संकट उभे आहे. हे टाळण्यासाठी भारताला फलंदाजीमध्ये सुधार करत मोठी धावसंख्या उभारण्याची गरज आहे.