
ऑकलँडच्या (Auckland) इडन पार्क मैदानावर भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) पुन्हा एकदा आमने-सामने येण्यास सज्ज आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात किवी कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकला आणि प्रतिस्पर्धी संघाला पहिले गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. पहिल्या सामन्यात उच्च स्कोअरिंग गेम पाहायला मिळाला आणि आजचा सामनाही त्याच मैदानावर खेळला जाणार असल्याने पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येचा खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. यापूर्वी, शुक्रवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेटने सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली होती आणि आजचा सामना जिंकून न्यूझीलंडवर आघाडी कायम ठेवू इच्छित असेल. ऑकलँडच्या या मैदानावर भारताने आजवर खेळलेले दोन्ही टी-20 सामने जिंकले आहे आणि आज टीम या मैदानावरील विजयी घुडदौड कायम ठेण्याचा प्रयत्न करेल. ('Linkedln Facebook Instagram Tinder' चॅलेंजमध्ये सामील झालेल्या ICC ने मार्नस लाबूशेन ला म्हटले स्टिव्ह स्मिथ चा डुप्लिकेट, चेतेश्वर पुजारा साठी केले 'हे' खास Tweet)
आजच्या सामन्यासाठी टीम इंडिया आणि न्यूझीलंडच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एकही बदल झाला नाही. भारत आता मालिकेत 1-0 ने पुढे आहे, त्यामुळे दुसरा सामना जिंकत भारतीय संघ देशवासियांना प्रजासत्ताक दिनाची भेट देऊन किवीविरुद्धव्ही आघाडी अजून बळकट करू पाहिलं. मधल्या फळीत दडपणाच्या वेळी संघाने चांगली कामगिरी केल्यामुळे कोहली कर्णधार म्हणून समाधानी होता. श्रेयस अय्यरने 29 चेंडूत नाबाद 58 धावांनी आपले चौथे स्थान मजबूत केले आहे. भारतीय संघात होणाऱ्या वारंवार बदलांविषयी चिंता होती,या मात्र अय्यरच्या फॉर्मने सर्व चिंता दूर केल्या. श्रेयसने मागील वर्षी सप्टेंबरपासून सर्व 12 टी-20 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 34.14 च्या सरासरीने दोन अर्धशतकं ठोकली आहेत.
असा आहे भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्रा चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकुर.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, टिम सेफर्ट (विकेटकीपर), रॉस टेलर, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिशेल सेंटनर, हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी आणि ब्लेअर टिकनर.