मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: IANS)

'लिंक्डलन फेसबुक इंस्टाग्राम टिंडर' मिम्स चॅलेंज सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. या चॅलेंजनुसार युजर्सना त्यांच्या फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटची वेगवेगळी फोटोज एकाचवेळी शेअर करावी लागतात. या भागामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ही अनेक खेळाडूंचे फोटो शेअर करत या चॅलेंजमध्ये सामील झाले आहे. आयसीसीने (ICC) स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन यांचे मजेशीर फोटो शेअर करून आव्हान पूर्ण केले. आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हँडलने स्मिथचा सहकारी आणि ऑस्ट्रेलियाच्या नवीनतम फलंदाजीची ख्याती असलेल्या मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) याला त्याचा डुप्लिकेट म्हटले आहे. अ‍ॅशेस 2019 मध्ये स्मिथचा पर्याय म्हणून म्हणून स्थान देण्यात आल्यानंतर, लाबूशेनने फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि आता तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा एक महत्वाचा कोग बनला आहे.

शिवाय, आयसीसीने भारताचा टेस्ट फलंदाज पुजाराचेही फोटोज शेअर केला. आयसीसीने तिन्ही प्लॅटफॉर्मसाठी पुजाराचा एकच फोटो वापरला असून सर्व परिस्थितीत भारतीय क्रिकेटपटूच्या सामान स्थितीचे संकेत दिले. "सोशल मीडिया काही लोकांसाठी सोपे आहे," पुजाराचा फोटो शेअर करताना आयसीसीने कॅप्शनमध्ये लिहिले. पाहा आयसीसीने शेअर केलेले हे ट्विट्स:

स्टिव्ह स्मिथ

चेतेश्वर पुजारा

स्टुअर्ट ब्रॉड-जेम्स अँडरसन

नवीन व्हायरल झालेला हा ट्रेंड या आठवड्याच्या सुरूवातीस अमेरिकन 74 वर्षीय गायक डॉली पार्टन यांनी किकस्टार्ट केला होता. 22 जानेवारी रोजी त्यांनी त्यांचे चार वेगवेगळे फोटो तयार केले आहेत आणि त्यांना सोशल मीडियाची नावं देऊन इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. लवकरच लोकांनी त्यांची स्टाईल कॉपी करण्यास सुरवात केली आणि हा ट्रेंड व्हायरल झाला. आणि त्याचे नाव देखील #DollyPartonChallenge म्हणून पडले.