केएल राहुल (Photo Credit: Twitter/KKRiders)

यजमान न्यूझीलंड (New Zealand) आणि टीम इंडिया (India) मध्ये ऑकलँड (Auckland) मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला गेला. या थरारक सामन्यात टीम इंडियाला पराभव पटकाराव लागला आणि मालिकाही गमवावी लागली. न्यूझीलंडने भारतावर 22 धावांनी मात केली आणि मालिका खिशात घातली. टॉस गमावल्यावर न्यूझीलंडने पहिले फलंदाजी करत 273 धावा केल्या. मार्टिन गप्टिल (Martin Guptill) आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांनी किवीकडून सर्वाधिक धावा केल्या. दुसरीकडे, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने पहिले नवदीप सैनी आणि नंतर युजवेंद्र चहल याच्या साथीने टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयशाला सामोरे जावेत लागले. भारताकडून श्रेयस अय्यर आणि जडेजाने अर्धशतकी खेळी केली, पण भारताचा पराभव टाळू शकले नाही. (IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडचा ऑकलँडमध्ये 22 धावांनी विजय, टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी)

आजच्या या सामन्यात दोन्ही देशांच्या खेळाडूंनी मनोरंजक विक्रमांची नोंद केली. गप्टिल आणि टेलरने किवी देशांत खेळत 4,000 वनडे धावा पूर्ण केल्या, तर जडेजा आणि सैनीने आठव्या विकेटसाठी रेकॉर्ड भागीदारी केली. जाणून घ्या:

1. जसप्रीत बुमराहने मागील तीन वनडे सामन्यात एकही गडी बाद न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बुमराहची ही नकारात्मक नोंद भारतासाठी बरीच धोकादायक आहे.

2. टेलर आणि भारताविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या काइल जैमिसन याने 9 व्या विकेटसाठी वनडेमध्ये तिसरी सर्वाधिक भागीदारी केली. दोंघांमध्ये आज 76 धावांची भागीदारी झाली. वनडेमध्ये नवव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड मॅट हेनरीआणि जिमी निशामच्या नावर आहे ज्यांनी भारतविरुद्ध 2016 मोहाली सामन्यात 84 धावांची भागीदारी केली होती.

3. टेलर-जैमिसनने ऑकलँड,मध्ये नवव्या सर्वाधिक 76 धावांची भागीदारी केली. यापूर्वी हा रेकॉर्ड गॅव्हिन लार्सन-ख्रिस प्रिंगलच्या नावर होता ज्यांनी 1993 ऑस्ट्रेलियाविरुद्ध 54 धावांची भागीदारी केली होती.

4. विराट कोहलीला मागे टाकत टेलरने भारत-न्यूझीलंड सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला. टेलरने 1373, तर विराटने 1369 धावा केल्या आहेत. भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावर आहे ज्याने 1750 धावा केल्या.

5. जडेजा आणि सैनीमंदाचे आठव्या विकेटसाठी चौथी सर्वाधिक 76 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी कोणत्याही भारत-न्यूझीलंड वनडे सामन्यात समान विकेटसाठी भारताची दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे. 1987 च्या बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुध्द कपिल देव आणि किरण मोरे यांनी तिसरी सर्वाधिक 82 धावांची भागीदारी केली होती.

6. जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत भारताकडून 7 व्यांदा अर्धशतक केले आणि माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि कपिल देव यांना मागे टाकले आहे. जडेजाने 7, तर धोनी आणि कपिल देवने या स्थानावर प्रत्येकी 6 अर्धशतकं केली आहेत.

7. विश्वचषकनंतर भारताचा कोणताही मालिकेतील हा पहिला पराभव आहे. जुलै 2019 नंतर भारताने 12 द्विपक्षीय मालिका खेळ्या. ज्यापैकी 11 मध्ये पराभव आणि 1 सामना ड्रॉ राहिला.

8. भारताविरुद्ध पदार्पणा सामन्यात काइल जैमीसनने नाबाद 25 धावा केल्या ज्या दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाने केलेल्या दुसऱ्या सर्वाधिक वनडे धावा आहेत. जेरोन स्मिट्सने 2003 भारताविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात 26 धावा केल्या होत्या.

9.  गप्टिल आणि टेलरने घरच्या मैदानावर खेळत 4000 वनडे धावा पूर्ण केल्या. गप्टिलने 92 डावात, तर टेलरने 97 डावात ही कामगिरी बजावली. गप्टिलने याबाबतीत सचिनची बरोबरी केली ज्याने तितक्याच डावात कामगिरी केली होती.

यानंतर आता दोन्ही देशांमध्ये तिसरा आणि अंतिम वनडे सामना 11 फेब्रुवारी रोजी, माउंट मॉनगनुईच्या बे ओवल मैदानात खेळला जाईल. टीम इंडियामध्ये क्लीन स्वीप टाळण्याच्या प्रयत्नासह मालिकेत पहिला विजय नोंदवू पाहिलं.