तब्बल 8 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कसोटी क्रिकेट भारतात परतणार आहे. टीम इंडिया (Team India) 25 नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या मालिकेत केन विल्यम्सनच्या न्यूझीलंडचा (New Zealand) पाहुणचार करेल. ब्लॅक कॅप्स त्यांच्या भारत दौर्याला 3 टी-20 सामन्यांसह सुरुवात करतील आणि आशियातील त्यांचा दीर्घ मुक्काम संपण्यापूर्वी 2 रेड-बॉल सामन्यात यजमानांशी भिडतील. क्रिकेटच्या झटपट फॉरमॅटसाठी संघ जाहीर झाला असताना कसोटी मालिकेबाबत अनेक अहवाल समोर येत आहे. अनेक अहवालांनी पुष्टी केली आहे की विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या कसोटीसाठी विश्रांती घेणार आहे आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 6व्यांदा नेतृत्वात चुरा हाती घेईल. रहाणे पहिल्या कसोटीत भारताचे नेतृत्व करेल आणि दुसऱ्या कसोटीसाठी परतल्यावर कोहलीला मदत करेल. भारताकडे बेंचवर बसलेले अनेक खेळाडू तयार आहेत आणि त्यांचा आता प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. चाहते कसोटी संघाच्या घोषणेची वाट पाहत असताना, या मालिकेसाठी संभाव्य संघ खालीलप्रमाणे आहे. (IND vs NZ 2021: न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी ‘या’ 3 स्टार खेळाडूंना मिळणार सुट्टी, T20 मालिकेतूनही बसवले बाहेर)
सलामीवीर
रोहित शर्मा कसोटी मालिकेत नसल्याने केएल राहुलला एक नवा जोडीदार मिळणार आहे. दुखापतीमुळे शुभमन गिलचा ब्रिटनमधील मुक्काम कमी झाला, तर पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यानंतर मयंक बेंचवर बसून राहिला. या दोघांपैकी कोणीही फेव्हरिट नाही आहे आणि राहुलसोबत कोण सलामीला उतरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. विशेष म्हणजे, मयंकला वगळण्यात आल्यानंतर राहुलला ब्रिटन दौऱ्यावर संधी मिळाली होती. त्याने दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला आणि आता आघाडीच्या एका जागेवर शिक्कामोर्तब केले आहे.
मधली फळी
पहिल्या कसोटीसाठी मधल्या फळीत कोहली नसल्यामुळे वरिष्ठ चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार रहाणे यांच्यावर धावा करण्याची जबाबदारी असेल. त्यांनी गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केलेली नाही आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी त्यांना घरच्या हंगामात लयीत परतण्याची संधी आहे. विहारी जो डाउन अंडर त्याच्या प्रसिद्ध 161 बॉलमध्ये नाबाद 23 धावांच्या खेळीनंतर एकही कसोटी खेळलेला नाही, त्याला या मालिकेत खेळ मिळण्याची शक्यता आहे.
अष्टपैलू
भारताच्या फळीतील तिन्ही फिरकीपटू बॅटने उपयुक्त योगदान देऊ शकतात. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा फिरकी हल्ल्याचे नेतृत्व करतील आणि इतर फलंदाजांनाही साथ देतील. तर खेळपट्टी सुकर असली तरच अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते.
गोलंदाज
इशांत शर्मा वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करणार आहे, ज्यात वरिष्ठ उमेश यादवचे पुनरागमन होईल. अंतिम इलेव्हनमध्ये इशांत, उमेश आणि मोहम्मद सिराज यांची निवड निश्चित दिसत आहे. आवेश खान, ज्याला पहिल्यांदा टी-20 संघात स्थान मिळाले आहे, त्याला कसोटी संघात देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. निवडल्यास, आश्चर्यचकित होऊ नका कारण आवेश यूके दौऱ्यातील नेट गोलंदाजांपैकी एक होता आणि त्याने 2018 मध्ये संघाला मदत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेलाही प्रवास केला होता. SA दौऱ्यासाठी भारत अ संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही, ज्यामुळे कदाचित त्याच्या निवडीबाबत संकेत मिळतो.
यष्टिरक्षक
रिषभ पंत नसल्यामुळे रिद्धिमान साहा जवळपास वर्षभरानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करू शकतो. त्याच्यासोबत केएस भरत सामील होईल, ज्याला त्याच्या पदार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागेल. भरतला अद्याप कसोटी संघाचा बुलावा आलेला नाही.
भारताचा संभावित कसोटी संघ: विराट कोहली (दुसऱ्या टेस्टसाठी कर्णधार), अजिंक्य रहाणे (पहिल्या टेस्टसाठी कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, हनुमान विहारी, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, रिद्धिमान साहा, के.एस. भरत, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, आणि आवेश खान.