IND vs NZ Test 2021: टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) नुकत्याच झालेल्या पराभवाने भारतीय संघाच्या (Indian Team) सेमीफायनल आशेला धक्का बसला होता आणि भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा आली होती. यापूर्वी किवी संघाने यंदाच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम (WTC Final) सामन्यातही टीम इंडियाला (Team India) धूळ चारली आणि चाहत्यांची मने तोडली होती. आता पुन्हा एकदा भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांशी भिडणार असून त्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand Cricket) आपला 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर लगेचच किवी संघ भारत दौऱ्यावर (NZ Tour of India 2021) रवाना होईल, जिथे दोन्ही संघांमध्ये T20 आणि कसोटी मालिका खेळली जाईल. गुरुवार, 4 नोव्हेंबर रोजी कसोटी मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) यांचा समावेश करण्यात आलेला नाही. किवी संघात 5 फिरकीपटूंना स्थान मिळाले आहे. (IND vs NZ 2021 Series: न्यूझीलंड मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना मिळणार आराम! ‘हा’ तडाखेबाज खेळाडू टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाची सांभाळणार धुरा!)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. टी-20 मालिकेसाठी फक्त न्यूझीलंडचा टी-20 विश्वचषक संघ मैदानात उतरणार आहे. यानंतर 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये पहिल्या सामन्याने कसोटी मालिकेला सुरुवात होईल, तर दुसरी कसोटी 3 डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळली जाईल. ही मालिका भारत-इंग्लंड कसोटी मालिकेपासून सुरू झालेल्या कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. टीम इंडियाची या चॅम्पियनशिपमधली ही दुसरी मालिका असेल, तर टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंड इथून आपल्या जेतेपदाच्या रक्षणाची सुरुवात करेल. किवीज संघाच्या नेतृत्वातची धुरा केन विल्यमसनच्या हाती असेल आणि बहुतेक तेच खेळाडू संघातील आहेत, ज्यांनी यंदा जूनमध्ये साउथॅम्प्टन येथे झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. तथापि त्या अंतिम सामन्यातील विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अष्टपैलू कॉलिन डीग्रँडहोम यांनी या मालिकेतून माघार घेतली आहे. NZC च्या निवेदनानुसार, बायो-बबलच्या थकव्यामुळे दोन्ही खेळाडूंनी या मालिकेतून विश्रांती घेतली आहे.
The squad for the team's Test Series against @BCCI starting later this month is here. Details | https://t.co/R4PIYBbIqt #INDvNZ pic.twitter.com/lo4vGbNaMm
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 4, 2021
न्यूझीलंड 15 सदस्यीय संघ: केन विल्यमसन (कॅप्टन), टॉस लॅथम, डेव्हॉन कॉनवे, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), हेन्री निकोल्स, रॉस टेलर, विल यंग, रचिन रवींद्र, टिम साऊदी, काईल जेमीसन, नील वॅगनर, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल सोमरविल आणि ग्लेन फिलिप्स.