IND vs NZ 2021 Series: न्यूझीलंडविरुद्ध T20I मालिकेसाठी टीम इंडियात मोठा बदल होऊ शकतो, ‘या’ दोघांची सुट्टी होणे निश्चित
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

येत्या काही दिवसांत बीसीसीआयचे (BCCI) नेतृत्व आणि राष्ट्रीय निवड समितीची बैठक होणार आहे. पुढील टी-20 विश्वचषक (T20 World Cup0 स्पर्धेसाठी अचूक 11 महिने शिल्लक असताना, राष्ट्रीय निवड समिती पुढील वर्षी जूनपर्यंत घरचा हंगाम संपेल तेव्हा शक्य तितक्या खेळाडूंना टेस्ट करेल. सध्या युएई आणि ओमान येथे सुरु असलेला आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 संपल्यानंतर भारतीय संघाला (Indian Team) घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) तीन सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी जिथे रोहित शर्माकडे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता असताना संघात काही मोठे बदलही पाहायला मिळू शकतात. या संदर्भात येत्या काही दिवसांत बीसीसीआय आणि निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत काही वरिष्ठ खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खराब फॉर्मशी झगडणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) संघातून एक्झिट मानली जात आहे. (IND vs NZ 2021 Series: न्यूझीलंड मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना मिळणार आराम! ‘हा’ तडाखेबाज खेळाडू टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाची सांभाळणार धुरा!)

भूवि संघाच्या खराब लयीत आहे आणि हार्दिक पांड्याच्या फिटनेसचे गूढ अद्याप सुटलेले नाही. त्यामुळे त्यांना न्यूझीलंडविरुद्ध T20 संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय आयपीएल 2021 चा ऑरेंज कॅपधारक रुतुराज गायकवाड, अव्वल गोलंदाजांपैकी आवेश खान, अनुभवी लेग-स्पिनर युझवेंद्र चहल यांसारखे आयपीएलमध्ये स्वतःला सिद्ध केलेल्या खेळाडूंचे संघात पुनरागमन होऊ शकते. यश मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारख्या आवश्यक वरिष्ठ खेळाडूंना मालिकेसाठी आवश्यक अशी विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच अष्टपैलू व्यंकटेश अय्यर, ज्याला भविष्यात पंड्याची जागा मिळू शकते असे अनेकांना वाटते, त्याला संधी मिळू शकते. जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची सरप्राईज निवड होऊ शकते कारण पुढील मोठी स्पर्धा उसळत्या ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषक 2022 साठी जवळपास 11 महिने बाकी आहेत आणि या वर्षी (2021) भारतीय संघाला एकही वनडे मालिका खेळायची नाही आहे.

दुसरीकडे अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, दीपक चाहर टी-20 मालिकेसाठी परत येऊ शकतात तर शुभमन गिल, मयंक अग्रवाल, उमेश यादव किवी संघाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत.