5 फेब्रुवारीपासून भारत (India) विरुद्ध सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी यजमान न्यूझीलंडने (New Zealand) 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंशिवाय एका युवा खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, लोकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री यांच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडला भारताविरुद्ध एका नवीन वेगवान गोलंदाजांची निवड करावी लागली आहे. स्कॉट कुग्गेलैन, हेमीश बेनेट यांच्यासह युवा काइल जेमीसन, (Kyle Jamieson) जो भारताविरूद्ध मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. नवीन वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व टिम साऊथी करेल. भारताविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये न्यूझीलंड संघाला मुख्य वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि त्यांच्या जागी असलेले युवा वेगवान गोलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. (IND vs NZ 3rd T20I: थरारक सुपर ओव्हर सामन्यात न्यूझीलंड पुन्हा पराभूत, टीम इंडियाने किवी देशात पहिल्यांदा जिंकली टी-20 मालिका)
ब्लॅक कॅप्सच्या नावावर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला केलेल्या ट्विटमध्ये जेमीसनचा फोटो शेअर करण्याव्यतिरिक्त लिहिले आहे की, “येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या आमच्या वनडे मालिकेच्या अगोदर ब्लॅक कॅप्समध्ये काईल जेमीसन पदार्पण करीत आहे.” जेमीसनने भारत अ विरुद्ध शानदार प्रदर्शन केले असल्याने त्याला संधी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जेमीसनने नुकताच भारत अ विरुद्ध न्यूझीलंड कडून खेळत 6 विकेट घेतल्या, आणि आजवरच्या प्रथम श्रेणी सामन्यात त्याने सुमारे 27 च्या सरासरीने 72 गडी बाद केले आहेत. दरम्यान, बेनेट आणि कुग्गेलैनने 2018 मध्ये आयर्लंड दौर्यावर शेवटचा वनडे सामना खेळला आहे. कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) ला फलंदाजीने साथ देण्यासाठी हेन्री निकोलस, टॉम लाथम (Tom Latham) आणि मार्टिन गप्टिल यांना स्थान मिळाले आहे. बोटाच्या दुखापतीने सावरत लाथमने संघात पुनरागमन केले. याचबरोबर कवी स्क्वाडमध्ये कॉलिन डी ग्रॅन्डहोम, जेम्स नीशम (James Neesham) आणि मिशेल सॅंटनर (Mitchell Santner) जसे ऑलराउंडर देखील समाविष्ट आहेत. फिरकी गेंदबाज ईश सोधी ही वनडे स्क्वाडचा भाग आहे पण तो फक्त पहिल्या वनडे सामन्यासाठी टीमसह राहणार.
Kyle Jamieson is eyeing a BLACKCAPS debut ahead of our ODI series with India starting next week #NZvIND https://t.co/eT0sf2DBMB
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 30, 2020
न्यूझीलंड वनडे संघ
केन विल्यमसन (कॅप्टन), हमीश बेनेट, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी ग्रॅन्डहोम, मार्टिन गप्टिल, काईल जेमीसन, स्कॉट कुग्गेलैन, टॉम लाथम, जिमी नीशम, हेन्री निकोलस, मिशेल सॅटनर, ईश सोढी (पहिली वनडे), टीम साउथी, रॉस टेलर.