टीम इंडियाने दिली पुतरुरुमध्ये ब्लू स्प्रिंग्सला भेट (Photo Credit: Twitter/BCCI)

टी-20 आणि वनडे क्रिकेटच्या थरारक सामन्यानंतर टीम इंडिया (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघ आता क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्वरूपात आमने-सामने येणार आहे. गुरुवारी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी तयार असणाऱ्या भारतीय संघाने (Indian Team) ब्लू स्प्रिंग्जच्या सौंदर्याचा आनंद लुटला. न्यूझीलंडमध्ये क्रिकेटपासून मिळालेल्या मोकळ्या वेळेचा भारतीय क्रिकेटपटू उत्तम वापर करीत असल्याचे दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सामायिक केलेल्या फोटोंमध्ये कर्णधार विराट कोहली दिसला नाही, मात्र चेतेश्वर पुजारा आणि आर अश्विन यांच्यासह अनेक जण ब्लू स्प्रिंग्जच्या (Blue Springs) सौंदर्याचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. भारत-न्यूझीलंडमधील दोन सामन्यांची टेस्ट मालिका 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. (जिमी नीशम याने केएल राहुल ला दिले 'पेपर,सीजर,रॉक' चे चॅलेंज, सुपर ओव्हरऐवजी ICC करू शकते या गेमचा वापर)

बीसीसीआयने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, "ब्लू स्प्रिंग्ज इथे दीर्घकाळ वॉल्क आणि संघातील मित्रांसोबत पूर्ण मजा केली. कसोटी मालिकेआधी टीम इंडियाने असा व्यतीत केला डे-ऑफ". ब्लू स्प्रिंग्ज आपल्या शुद्ध जलस्त्रोतांपैकी एक म्हणून ओळखले जाते. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोजमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सामन्यात सहभागी होणाऱ्या उर्वरित साथीदारांसह रिद्धिमान साहा, चेतेश्वर पुजारा, आर अश्विन आणि उमेश यादव दिसले. रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि युवा सलामीवीर शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ हेही आनंदी मूडमध्ये दिसले. पाहा फोटोज:

दरम्यान, सेडन पार्क (Sedon Park) वर शुक्रवारपासून न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध टीम इंडिया तीन दिवसीय सराव खेळ खेळणार आहे. टी-20 मालिकेत टीम इंडियाने, तर वनडे मालिकेत किवी संघाने भारताचा क्लीन स्वीप केला. 360 गुणांसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ 6 गुणांसह सहाव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध मोहीम पुन्हा सुरू करेल. यापूर्वी, न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेत 3-0ने क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते.