IND vs NZ 1st Test: केन विल्यमसन ने टॉस जिंकून भारताला दिले बॅटिंगचे आमंत्रण; पाहा कसा आहे भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन
टीम इंडिया (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) टीममधील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना आजपासून वेलिंग्टनच्या (Wellington) बेसिन रिझर्व खेळला जाणार आहेत. सामन्यापूर्वी झालेल्या टॉस दरम्यान किवी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) ने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेत प्रतिस्पर्धी टीमला पहिले फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारतासाठी डावाची सुरुवात मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ची जोडी करेल. पृथ्वीचा समावेश केल्याने शुभमन गिल ला बाहेर बसावे लागले आहे. रिद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतला (Rishabh Pant) संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत झालेल्या दुखापतीनंतर पंत पहिल्यांदा खेळताना दिसेल. रविचंद्रन अश्विन टीममध्ये एकटा फिरकी गोलंदाज आहे. टीमसाठी हनुमा विहारी सहाव्या स्थानी फलंदाजी करेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा वेगवान गोलंदाजीत भारताचे नेतृत्व करतील.

दुसरीकडे, किवी टीमसाठी ट्रेंट बोल्टचे (Trent Boult) प्लेयिंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. शिवाय, काइल जैमीसनला (Kyle Jamieson) डेब्यू करण्याची संधी मिळाली आहे. जैमीसनने यापूर्वी वनडे मालिके दरम्यान पदार्पण केले होते, ज्यात त्याने चांगली कामगिरी बजावली होती. ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते. कोहलीच्या नेतृत्वात भारताने आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत आजवरचे सर्व सात कसोटी सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने मार्च 2017 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना गमावला नाही.

पहिल्या टेस्ट मॅचसाठी असा आहे भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन

भारत: मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन, हनुमा विहारी, रिषभ पंत, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम ब्लंडेल, कॉलिन डी ग्रैंडहोम, बीजे वॉटलिंग, काईल जेमीसन, टॉम लाथम, हेन्री निकॉल्स, एजाज पटेल, टिम साउथी, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट.