वेलिंग्टनमध्ये सुरु असलेल्या भारत (India) -न्यूझीलंड (New Zealand) मधील पहिल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. पहिल्या दिवशी टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करणाऱ्या किवी टीमने लंच पूर्वीच टीम इंडियाला 165 धावांवर ऑलआऊट केले. किवी टीमकडून काईल जैमीसन (Kyle Jamieson) आणि टिम साऊथी (Tim Southee) यांनी गोलंदाजीने जोरदार कामगिरी बजावली आणि भारतीय फलंदाजांना अडचणीत पडले. जैमीसन आणि साऊथीने प्रत्येकी चार गडी बाद केले. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 46 धावा केल्या. लंचच्या वेळेपर्यंत न्यूझीलंडकडून टॉम लाथम (Tom Latham) आणि टॉम ब्लंडेल (Tom Blundell) यांनी डावाची सुरुवात केली आणि एकही विकेट न गमावता ओव्हरमध्ये 17 धावा केल्या. न्यूझीलंड लंच पर्यंत भारताच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात अजून 148 धावांनी पिछाडीवर आहे. लाथम आणिब्लंडेल धावा करून खेळत आहेत. दुसर्या दिवसाच्या सुरूवातीला रहाणे आणि रिषभ पंत यांनी 122 धावांवर खेळ सुरू केला. (IND vs NZ 1st Test Day 2: काईल जैमीसन आणि टिम साऊथी यांची घातक गोलंदाजी, टीम इंडिया पहिल्या डावात 165 धावांवर ऑलआऊट)
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने 55 षटकांत 5 बाद 122 धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल 34, पृथ्वी शॉ 16, चेतेश्वर पुजारा 11, विराट कोहली 2 आणि सराव सामन्यात शतक झळकावणार्या हनुमा विहारीने केवळ सात धावा केल्या. न्यूझीलंडकडून पदार्पण करणाऱ्या जैमीसनने 3 गडी बाद केले होते. रहाणेने डाव हाताळण्याचा प्रयत्न केला आणि स्कोअर 150 धावांच्या जवळ नेला, परंतु दुसऱ्या दिवशी त्याचे अर्धशतक हुकले आणि 46 धावांवर बाद झाला. शेवटी, मोहम्मद शमीने 21 त्वरित धावा करुन भारताची धावसंख्या 165 धावांवर नेली.
पहिल्या डावात कीवी गोलंदाजांनी कहर केला. साऊथी आणि जैमीसनने चार आणि ट्रेंट बोल्टला एक विकेट मिळाली.