IND vs NZ 1st Test Day 2: काईल जैमीसन आणि टिम साऊथी यांची घातक गोलंदाजी, टीम इंडिया पहिल्या डावात 165 धावांवर ऑलआऊट
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील पहिली कसोटी वेलिंग्टनमध्ये खेळली जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. टॉस जिंकून न्यूझीलंडने पहिल्या दिवशी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रा आधीच भारताला ऑलआऊट केले.  पहिल्याच दिवशी भारतीय संघाने 5 गडी गमावून 122 धावा केल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी टीम इंडिया धावांवर 165 ऑलआऊट झाली. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी दुसर्‍या दिवशी भारतीय डावाची सुरुवात केली. रहाणेने सर्वाधिक 46 धावा केल्या. या शिवाय, मयंक अग्रवाल 34, पृथ्वी शॉ 16 आणि पंतने 19 धावांचे योगदान दिले. कर्णधार विराट कोहली केवळ 7 चेंडूत 2 धावा करू शकला. काईल जैमीसन (Kyle Jamieson)-टिम साऊथी (Tim Southee) यांनी प्रत्येकी 4 आणि ट्रेंट बोल्ट यांनी 1 गडी बाद केला. जैमीसनचा भारतविरुद्ध डेब्यू सामना आहे आणि त्याने पहिल्या डावात 4 विसकट घेऊन त्याला संस्मरणीय बनवले. (विराट कोहली न्यूझीलंड दौऱ्यावर पुन्हा एकदा फ्लॉप; 2004 इंगलंड दौऱ्यानंतरचा सर्वात वाईट फॉर्म, 19 डावापासून शतकाचा दुष्काळ कायम)

किवी गोलंदाजांनी भारताला पाहिल्या दिवशी भरपूर त्रास दिला आणि त्यानंतर दिवसाचे तिसरे सत्र पावसामुळे खेळू शकले नाही. आवश्यक प्रकारची भारताला सुरुवात झालेली नाही आणि किवी गोलंदाज सतत टीम इंडियाच्या अडचणीत वाढ करत राहिले. पंत आणि अजिंक्यने दुसर्‍या दिवशी भारतीय डावाची सुरुवात केली. पंतने 19 धावा फटकावल्या आणि एजाज पटेलच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे धावबाद झाला. दुसऱ्या दिवशी 132 धावांवर भारताने पहिले पंत आणि नंतर रविचंद्रन अश्विन (Ashwin) यांची विकेट गमावली. यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर सावधपणे फलंदाजी करणार्‍या रहाणेनेही आपली विकेट गमावली. रहाणे अर्धशतक पूर्ण करेल असे दिसत असताना 46 धावांवर साऊथीने त्याला किपर बीजे वॅटलिंगकडे कॅच आऊट केले आणि किवी टीमला मोठी विकेट मिळवून दिली.

पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मयंकने भारताकडून पहिल्या डावात सर्वाधिक 34 धावा केल्या होत्या. किवी टीमकडूनजैमीसन भारताविरुद्ध सामन्यातून आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने यापूर्वी, वनडेमधेही भारताविरुद्ध डेब्यू केले होते.