IND vs NZ 1st Test Day 1: न्यूझीलंड गोलंदाजांसमोर भारताच्या टॉप ऑर्डरने टेकले गुडघे, Lunch पर्यंत केल्या 79/3
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Twitter/ICC)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील पहिला टेस्ट सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाच्या लंच ची वेळी झाली आहे. या दरम्यान भारताने तीन विकेट गमावून 79 धावा केल्या आहेत. सध्या सलामी फलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) 29 आणि भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नाबाद 19 धावा करून खेळत आहे. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 39 भागीदारी झाली आहे.  आजपासून सुरु झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि भारताला पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले. मयंक आणि पृथ्वी शॉ ने भारताकडून डावाची सुरुवात केली. पृथ्वी 16, चेतेश्वर पुजारा 11 आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 2 धावा करून माघारी परतले. लंचपर्यंत न्यूझीलंडसाठी डेब्यू करणाऱ्या काईल जैमीसन (Kyle Jamieson) ने दोन आणि टिम साऊथी ने एक गडी बाद केला. जैमीसनने सर्वात महत्वाची कॅप्टन कोहलीची विकेट काढली. न्यूझीलंडमध्ये यंदाच्या दौऱ्यावर विराटचे खराब प्रदर्शन सुरूच राहिले. (IND vs NZ 1st Test: रॉस टेलर याचे अनोखे शतक, टीम इंडियाविरुद्ध पहिल्या सामन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास)

प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि 5 व्या ओव्हरमध्ये त्यांना पहिला धक्का बसला. सलामी फलंदाज पृथ्वीने वेगवान सुरुवात केली पण साऊथीने त्याला केवळ 16 धावांवर पॅव्हिलिअनमध्ये पाठवले. 18 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा करणार्‍या पृथ्वीला साऊथीने बोल्ड केले. त्यानंतरजैमीसनला पुजाराच्या रूपात पहिली टेस्ट विकेट मिळाली. 42 चेंडूत खेळून पुजारा वॅटलिंगकडे झेलबाद झाला. कर्णधार कोहलीने 7 चेंडूत 2 धावा फटकावून रॉस टेलरला आपला झेल दिला. कालने कोहलीला बाद करुन न्यूझीलंडला मोठे यश मिळवून दिले.

आजच्या सामन्यात रिषभ पंतला अनुभवी रिद्धिमान साहाच्या जागी संघात संधी देण्यात आली आहे. दोन साम्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांना जोरदार लढत देऊ पाहत आहे. 3 वर्षानंतर दोन्ही संघ टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले आहेत.