भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: Getty Images)

टी-20 आणि वनडे मालिकेत दमदार खेळीनंतर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघाने आता क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्वरूपाकडे लक्ष केंद्रित केले आहे. टीम इंडियाने टी-20 मालिकेत पहिल्यांदा किवी संघाचा क्लीन स्वीप केला, तर यजमान न्यूझीलंडने त्याचा प्रतिशोधच्या रूपात वनडे मालिकेत भारताला धूळ चारली. आता टेस्ट मालिकेत दोन्ही टीम्स एकमेकांना काटेरी टक्कर देऊ पाहिलं. भारत-न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जाईल. पहिला सामना 21 फेब्रुवारी आणि दुसरा 29 फेब्रुवारीला खेळली जाईल. या मालिकेद्वारे भारतीय संघ न्यूझीलंडकडून वनडे मालिकेत झालेल्या 3-0 च्या पराभवाचा बदला घेऊ इच्छित असेल. मालिकेचा पहिला सामना 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह (Basin Reserve) येथे खेळला जाईल. (IND vs NZ 2020: वेलिंग्टन टेस्टसाठी असा असेल भारताचा प्लेइंग इलेव्हन, रिद्धिमान साहा-रिषभ पंत मधील गोंधळ कायम)

भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टस्ट सामना शुक्रवार, 21 फेब्रुवारी रोजी वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व मैदानावर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सकाळी 4:00 वाजता सुरू होईल. सकाळी 3.30 वाजता नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर लाईव्ह टेलिकास्ट होईल. सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

अखेरच्या टी-20 सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाल्याने वनडे आणि टेस्ट मालिकेला त्याला मुकावे लागले. यामुळे पुन्हा एकदा मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ भारतासाठी डावाची सुरुवात करतील. मयंक आणि पृथ्वीला वनडे मालिकेत साजेशी कामगिरी करता आली नसल्याने टेस्टमध्ये दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीची यंदाचा दौरा काही खास राहिला नाही. टी-20 आणि वनडे मालिकेत विराट बॅटिंगने फेल ठरला आणि याची भरपाई तो आता टेस्टमध्ये करू शकेल की नाही हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल. दुसरीकडे, भारतलं गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा असतील. मर्यादित षटकारांत वेगवान गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली होती. न्यूझीलंडलाही त्यांच्या गोलंदाजांकडून प्रभावी खेळीची अपेक्षा असेल.

असा आहे भारत-न्यूझीलंड टेस्ट संघ

भारत: मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि उमेश यादव.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रैंडहोम, काईल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेन्री निकॉल्स, एजाज पटेल, टिम साउथी, रॉस टेलर, नील वैगनर, बीजे वॉटलिंग.