विराट कोहली आणि टॉम लाथम (Photo Credits: IANS)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील पहिला वनडे सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्क (Seddon Park) मैदानात थोड्याच वेळात सुरु होणार आहे. सामन्यापूर्वी झालेल्या टॉसमध्ये किवी कर्णधार टॉम लाथम (Tom Latham) याने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून वनडे मालिकेत मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांची नवीन जोडी डावाची सुरुवात करेल. केदार जाधव यानेही संघात पुनरागमन केले आहे. रोहित शर्माच्या दुखापतीमुळे मयंक, तर शिखर धवन जखमी झाल्यानंतर पृथ्वीची संघात निवड झाली. दुसरीकडे, आजच्या सामन्यासाठी किवी संघाच्या प्लेयिंग इलेव्हनमधेही काही बदल झालेले दिसून येत आहे. यजमान किवींकडून टॉम ब्लंडेल (Tom Blundell) याने वनडेमध्ये पदार्पण केले. म्हणजे आजच्या सामन्यातून एकूण तीन खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  मिशेल सॅटनर आणि ईश सोढी आजचा सामना खेळत आहे, तर जिमी निशाम (Jimmy Neesham) याने पुनरागमन केले आहे. दोन्ही संघ वनडे मालिकेची सुरुवात विजयासह करू इच्छित आहेत.

यापूर्वी झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात नियमित किवी कर्णधार केन विल्यमसन याला दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांसाठी बाहेर करण्यात आल्याने टॉम लाथम संघाचे नेतृत्व करत आहे. टी-20 मालिकेत क्लीन स्वीपनंतर यजमान किवी वनडे मालिकेत पुनरागमन करू पाहत असेल. त्यांना टीम इंडियाविरुद्ध विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्नशील राहावे लागणार आहे.

असा आहे भारत-न्यूझीलंडचा प्लेयिंग इलेव्हन

भारत: पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड: मार्टिन गप्टिल, हेन्री निकोलस, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, टॉम लाथम, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रॅन्डहोम, मिशेल सॅटनर, ईश सोधी, टिम साउथी, हमीश बेनेट