IND vs ENG Test Series 2021: कोविड-19 महामारीच्या संबंधित प्रवासाच्या निर्बंधामुळे अहमदाबाद (Ahmedabad) येथे 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या भारताविरुद्ध (India) चौथ्या कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू सॅम कुरन (Sam Curran) इंग्लंड (England) संघात निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. गुरुवारी याबाबत घोषणा करण्यात आली. कुरन आता मर्यादित ओव्हरच्या इंग्लंड संघासह भारतात येणार आहे. इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने एका निवेदनात म्हटले की, "सॅम कुरन 26 फेब्रुवारी रोजी मर्यादित षटकांच्या संघातील इतर सदस्यांसह चार्टर्ड विमानाने भारतात आणि इंग्लंड संघात सामील होतील." पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती घेतलेल्या कुरनला 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी अहमदाबादला जायचे होते परंतु, त्याऐवजी तो आता मर्यादित षटकांच्या संघासह ते दाखल होईल. तिसर्या कसोटी सामन्यानंतर क्रिस वोक्स नियोजित योजनेप्रमाणे संघाबाहेर होईल आणि कुरनने ती जागा भरणे अपेक्षित होते. (IND vs ENG 3rd Test D/N 2021: तिसर्या टेस्ट सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा; दोन स्फोटक गोलंदाज करणार कमबॅक तर ‘या’ खेळाडूची होणार मायदेशी रवानगी)
ईसीबीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, “सुरुवातीला असे केले गेले होते की सरे अष्टपैलू खेळाडू अहमदाबादमध्ये चौथ्या कसोटी सामन्यासाठी अहमदाबादला वेळेवर उड्डाण करेल. तथापि, महामारीमुळे अशा प्रवासाची सुरक्षा व्यवस्था करणे हे एक मोठे आव्हानात्मक सिद्ध झाले.” श्रीलंकेविरुद्ध 2-0 क्लीन स्वीप विजयानंतर जॉनी बेअरस्टो, कुरन आणि मार्क वूड यांना विश्रांती देण्यात आली होती. भारत दौऱ्यावर तिसरा कसोटी सामना 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर सुरू होईल, तर चौथा आणि अंतिम सामना 4 मार्चपासून त्याच स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तिसरा आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंड संघ अहमदाबादला दाखल झाले आहेत. इंग्लंड दौर्याचा मर्यादित ओव्हर मालिकेसह टी-20 सामन्यापासून 12 मार्चपासून सुरू होईल.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. दुसर्या कसोटी सामन्यात 317 धावांनी विजय मिळवून भारताने मालिकेत बरोबरीच साधली नाही, तर पराभवाची परतफेड देखील केली. उर्वरित दोन कसोटी सामन्यांनंतर दोन्ही संघ या नंतर टी -20 आणि एकदिवसीय मालिका खेळतील.